सांगली कोल्हापूरच्या पूराची कविता
२०१९ सालीची कोल्हापूर सांगलीची स्थिती वर्णन करणारी कविता -
सांगली कोल्हापूरला जणू नजरच लागली
नजर जाईल तिकडं बगा हाय, पाणीच पाणी
व्हय की व्हयकी म्हणणारी आता नाय की नाय की करू लागली
चांंगली चांगली म्हणता यंदा कृष्णामाई वंगाळ वागली
तीरावरच्या लेकरांना लगबगीनं भेटाय आली
पण लेकरांसंगं घरादारात कृष्णामाई लईवेळ रमली
पावन केलीस भूमी माझी तुझ्या पावन स्पर्शानं
पण गुरं-ढोरं-बकऱ्या-मेंढरं वडूनच नेलीस जोरानं
बघता बघता घरला माझ्या पडला तुझाच घेरा
सगळं सोडून बेघर झाला प्रत्येक घरचा राजा
पाया पडतू हात जोडतू का बाई कावलीस आमच्यावर
तुझ्यामुळच तर निवांत जगलो, पण घेतलस आता फैलावर
लई कमवलं तुझ्या साक्षीनं, आता झालो कफल्लक
परत शून्यात नेऊन ठेवलस वाढली जीवाची धकधक
कृष्णा माई तुझ्या भेटीनं झाला जीव हा कृतार्थ
पुन्हा नव्याने उभे राहाण्या कर आम्हा तू समर्थ, कर आम्हा तू समर्थ!
😢🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽😢
प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक©


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा