आजची पिढी, मनसे आणि सेना

शिवसेनेचा सध्याचा काळ फारच वाईट सुरुय. मुंबईतला पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षाला लोकसभेच्या वेळी मुंबईतल्या त्यांच्या मुख्य स्थानालाच धक्का लागल्यानं अनेकांनी आचंबा व्यक्त केला. आतातर विधानसभेला तर १३ जागांवर निवडून येत मुंबईसकट इतरही ठिकाणी मराठी मतांना खेचण्याचं काम मनसेने केले. त्याचा त्रास बाळासाहेबांना होतोय हे सेनेच्या मुखपत्रातल्या आग्रलेखातूनही दिसून आलं. पण इतकच नाही तर तब्बल ३ दिवसांनंतर माध्यमांसमोर हजर होऊनही सेनेच्या कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय अपरिपक्वताच दिसून आली. ही झाली सेनेच्या पडझडीबद्दलची काही वरकरणी दिसणारी कारणं.
आता मनसेची हवा कानिर्माण झाली यावर नजर टाकुया- सर्वसाधारणपणे तरुण चेहेरे पाहायला सर्वांनाच आवडतं किंवा वयस्क चेहेऱ्यांच्या तुलनेत ते बरं वाटतं.( उदाहरण.- एकाच वेळी टीव्ही स्क्रीनवर मनमोहन सिंग आणि राहुल गांधी असतील तर आपसूकच नजर राहूल गांधीकडे वळते.) ही मानसिकता आहेय. आणि हेच घडतंय मनसे आणि शिवसेनेच्या बाबतीत. मनसेचे प्रमुख चेहेरे तीशी-चाळीशीतले आहेत, या उलट शिवसेनेचे जे काही मुख्य चेहेरे आहेत(अजून आदित्य सक्रिय नाहीय),पण जे आहेत ते जवळपास पन्नाशीच्या जवळचे आहेत. (त्यामुळेच फरक तो पडता है!) एकंदरितच आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची सत्वपरीक्षा आता शिवसेनेवर आलिय. तुलनेत मनसेला आता संपूर्ण महाराष्ट्र काबिज करायचाय आणि त्यांना तरुणांची, महिलांची चागंली साथ मिळतेय. मुळात हा प्रश्न प्रामुख्यानं जाणवण्याचं कारण आजची पिढीच आहे. त्यांच्यावरर सध्या वृत्तपत्रापेक्षा टेलिव्हीजन माध्यमांचा प्रभाव जास्त आहे. ज्या थेट फायदा मनसेला मिळतोय असं होऊ नये असं सेनेला वाटत असेल तर अत्ताच सावधान होण्याची गरज आहेय हे नक्की!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा