तुमाला बघून ठरिवलं, पोरीला शिकवनार!
एक दिवस जांब गावातला..
एक १२-१३ वर्षाचा मुलगा मी दिसले की ओरडायचा 'स्टार माझा.. स्टार माझा' आणि मी त्याच्याकडे पाहून हासत होते, मग तो आपणहुनच जवळ आला आणि म्हणला, "ओ, तुम्ही असताय ना स्टार माझावर.." मी होकारार्थी मान हालवलली, "मी तुम्हाला पाहिलंय स्टार माझावर.., पण मी स्टार माझा पाहात नाही मला पिच्चर खूप आवडतात म्हणून मी स्टार गोल्ड पाहतो..." मी खळखळून हसले...हा संवाद आहे, समर्थांच्या जांब गावतल्या शाळकरी मुलाचा आणि माझा.कीर्तनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळते, तिथलं वातावरण, भाषा, विचार यांचाही थोड्याफार प्रमाणात परिचय होतो.. नुकतंच समर्थांच्या जांब गावला म्हणजेच जांब समर्थ या गावी कीर्तन होतं. तशी मी जांबगावला पहिल्यांदा गेलेली नाही या पूर्वीही मी दोन वेळा जांबगावला गेलीय.. ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवांच्या इच्छेने व कृपेने तिथे जााण्याचा योग आलाय. मात्र गेल्या तीन वर्षात संधी मिळूनही नोकरीच्या रहाटगाडग्यात जाणं शक्य झालं नव्हतं. या वेळी मात्र योग जुळून आला.
जांब हे जालना जिल्ह्यातलं खेडेगांव. १२ते १४ तास लोडशेडींग असलेलं गाव. शाळा दहावी पर्यंत. भाजी, दूध, धान्य असं सामान घ्यायचं झालं तर थेट तिथुनच जवळ असलेलं(म्हणजे८-१० किमी लांब असलेलं) पिंपळ गावच गाठावं लागतं. एसटी या गावात जात नाही, फार काही वाहनांची व्यवस्थाही नाही. अशा या समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी जाण्याचा चांगला योग पुन्हा एकदा आला. सांगण्याचा मुद्दा हा की, या गावातील मुलं फारच हुशार आहेत. त्यांच्यात बरेच कलागुण लपलेले आहेत. पण ते बाहेर येतातच असं नाही.. या मुलांच्या माध्यमातून जांब गावात परमेश्वर, पांडुरंग, लवांकुश असे सगळे ईश्वरी अवतारच अवतरलेत, ते मला भेटले.. ही मुलं खरोखरीच खास आहेत यात काही शंका नाही..ही सगळी मुलं, मला आता चांगलीच ओळखतात. कीर्तन झाल्यावर या मुलांशी माझी चांगलीच गट्टी जमली. मग ती मुलं आणि मी लाईट नसल्यानं झाडाखाली पोतं टाकून छान गारव्यात बसलो होतो.. तेवढ्यात नाव, गाव, फळ, फूल असा तोंडी खेळ खेळायला सुरुवात झाली, त्यातून तिथल्या मुलांची आवड, आसपासच्या परिसराची त्यांना असलेली जाण आणि त्यांची हुशारी समजली.. आधी आम्ही तिघेच होतो मग हळू हळू सात-आठजण जमले. त्यातच दासबोधाच्या पारायणासाठी आसपासच्या शहरातून आपल्या पालकांसोबत एक मुलगी आली होती. ही शहरातून आलेली मुलगी नवनवीन नावं सांगत होती, तर ही पोरं आजूबाजूच्या गावांची नावं सांगत होती.. मध्येच आजूबाजूला पाहून 'परमेश्वर देवकर' (जांबेतला ईश्वरी आवतार) म्हणजे ७-८ वर्षाचा हा गडी पटापट नावं सांगत होता, त्याच्यावर जसा 'व' हा शब्द आला, त्यानी पटकन सांगितलं वठ, वठ.. मी त्याच्याकडे 'काय सांगतोय हा?' अशा नजरेनं पाहताच त्यानं दोन दात पडलेल्या त्याच्या ओठांकडे बोट दाखवत सांगितलं वठ, वठ..!! ह्यावर मी एकटीच हासले कारण बाकी सारे त्याचेच मित्रगडी होते.. त्याचे 'वठ' हा शब्द फेटाळून लावत मी त्याची चूक दुरुस्त करुन नवीन नाव सांगायला सांगीतलं.. मग विचार करुन लगेच त्यानं बाजूलाच असलेल्या विहीरीकडे पाहून 'विहीर' हा शब्द सांगितला.. त्याचं कौतुक वाटून मी त्याला शाब्बासकी देत पाठीवर थाप मारली आणि लागलीच त्याच्या पाठीवरुन धुळीचे खकाणा उडून तो माझ्या आणि त्याच्या बाजूच्या मित्रापर्यंत जाऊन पोहोचला.. खरोखरीच ती मुलं एकच कपडा कित्येक दिवस वापरत होते... त्यातच त्यांना 'ज' हा शब्द फारच आवडीचा असल्याचं लक्षात आलं, कारण ज आलं की लगेच आरे गड्या आपलं गावकी..जांब असं म्हणून ते खूष होत, नाहीतर मग आपलाच जिल्हा जालना.. आपल्या सखूभाऊची जीपडी... असे शब्द आठवून ते हासत होते... हा खेळ बराच रंगला.. आता माझी निघायची वेळ झाली, मुलं मला पूर्ण सप्ताहच करुन जा असा 'सल्ला' मला देत होती. पण मला मात्र थांबून चालणार नव्हतं..

पण अचानक तिथे एक मोठ्ठं कुंकू लावलेल्या बाई आल्या. आणि त्यांनी मी आणि सोबत बसलेल्या रेश्माकडे पाहून हात जोडले, नमस्कारच करू लागल्या. कीर्तनवेशात नमस्कार समजू शकतो, अर्थात तोदेखील मी भगवंतचरणीच अर्पण करते, पण याबाईंचं हे वागणं कळेचना. त्यांना आम्ही हाताला धरून विचारलं, अहो ही कीर्तनाची गादी नाही, नमस्कार त्या गादीला असतो, आम्हाला नाही. त्यावर त्या पटापट बोलू लागल्या, "पोरींनो माझी पोरगी १०वी झाल्यावर मी तिला शाळ्तून काढली, म्हनलं आता शिकायचं नाय, काय शिकून पोरी करत्यात? वायाच जात्यात नवं, असं माजं मत व्हतं, पण काल तुमचं कीर्तन ऐकलं, नोकऱ्याबी करताय हे ऐकलं आन् डोळंच उघडलं. अत्ता बघा शहरात जाऊन पोरीला ११वीची अॅडमिशन घेऊनच आली. खरं सांगित्ते, तुमाला बघून ठरिवलं, पोरीला शिकवनार! " एका दमात त्या सगळं बोलल्या आणि आम्ही खरोखरीच धन्य पावलो.
तो दिवसच धन्य होता! आता निघायची वेळ झाली,
मला तिथून २४ किमी अंतरावर असलेल्या परतूरवरुन गाडी होती.. मग काय मला सोडायला सगळी फल्टन आली गावाबाहेर.. तिथे सगळ्यात शेवटी 'ईश्वरी आवतार' म्हणजे परमेश्वर देवकर पण आला. त्याला म्हंटलं, 'काय रे, तू इंकडं कसा?' लगेच रस्त्याच्या त्या बाजूला हात दाखवत त्यानं सांगितलं आमचं हाटीलाय इकडं...,त्याच्या त्या हाटीलकडं (हॉटेलकडं) पाहीलं.., एका बांबूच्या आधारानं जसा गोठा बांधला जातो अगदी तस्सच ते हाटील होतं.. तिथे त्याची मोठी बहीण (१०-१२ वर्षांची) काही काचेच्या बरण्यात गोळ्या, बिस्कीटं, गुटख्याची पाकीटं, बॉबीच्या पिवळ्या कांड्या घेऊन बसली होती आणि गावातली ४-५ मंडळी तिथं गप्पा ठोकीत उभी होती. तिथे संध्याकाळी पाच नंतर गाडी म्हणजे त्यांची जिपडी येत नसल्यानं आम्ही मंडळी साडेचार पासूनच तिथे उभे होतो.. शेवटी तिथे सहाच्या दरम्यान जिपडी आली ती गच्च भरली होती. मला पाहुन ातल्या बायकांनी मधला दरवाजा उघडला, मी जाऊन बसले. बसतानाच लक्षात आलं की चार डोकी माझ्याकडे पाहात होती, एक माझं आणि नंतर मला, 'आत सरीक..,सरीक.. आंगं अश्शी...' असं म्हणत आणखी एक डोकं स्थानापन्न झालं. मी धरुन आम्ही सहाजणी मधल्या सीटवर पुढच्या सीटवर ड्रायव्हरसकट पाचजण त्यातला एक तर आख्खाच ड्रायव्हरच्या सीटवर होता, फक्त ड्रायव्हरला फार त्रास होत नव्हता. कारण तो दोघे मिळून ड्रायव्हरच्या एका सीटवर मावले होते.. दोघे अगदी काडीच म्हणा ना..! बर हे झालं जीपडीच्या निम्यातलं मागे तर विचारुच नका... मोजता आली नाहीत कारण मला मागे वळताच येत नव्हतं, पण तरी ती देहा ते १२ जणं नक्की असणार.. हे कमी की काय म्हणून माझं सहज बाहेरच्या आमच्या जीपडीच्या सावलीकडे लक्ष गेलं तर त्य़ा जीपडीवर बसलेली मोजून पाहिलेली सात टाळकी दिसली!! यूपी, बिहारमधल्या गावातली आणि आपल्या इथल्या गावातली 'ट्रान्सपोर्ट सिस्टीम' यात फारच साम्य असल्याचा साक्षात्कार मला झाला!! अहो पण हे काहीच नाही.., हे माझ्या लक्षात आणून देण्यासाठीच जणू समोरुन आणखी एक जिपडी आली. ती आमच्या जिपडीप्रमाणे भरलेली तर होतीच पण माझ्या भुवया आणखीनाणखीन उंचवण्यास तिने मदत केली.., त्या जिपडीत लई पब्लिक होतंच पण ड्रायव्हरला प्रॉब्लेम नको म्हणून त्याच्या समोरचा भाग सोडून दोन गडी बॉनेटवर गाडीचे हिचके निर्विकार चेहेऱ्यानं सोसत बसलेले होते! त्यातच ज्या रस्त्यावरुन आम्ही जात होतो तो रस्ता एक जिपडी आणि एक दुचाकी जाऊ शकेल इतकाच होता. तरीही त्यातून टेंम्पो, बैलगाड्या, ट्रॅक्टर व्यवस्थित एकमेकांना 'अॅडजेस्ट' करत जात होते.यापीर्वी आम्ही तिघेजण एकत्र आल्यानं या सगळ्याचाअनुभव मला आला नव्हता. आमची स्वतंत्र गाडीच आम्ही नेली होती.. पण या वेळच्या या दिव्य अनुभवानं मी 'धन्य' पावले. विकासाच्या गप्पा ठोकणाऱ्या आपल्या राजकीय नेत्यांची मला नेमकी प्रकर्षानं आठवण आली. पण मी घेतलेल्या अनुभवाबद्दल त्यांना माहितीच नाही हे मात्र कोणला सांगूनही पटणार नाही. असो, मला या ठिकाणी खरा आनंद मिळतो तो समर्थांच्या जन्मगावी गेल्याचा.. आणि तिथल्या चिमुकल्यांच्या निखळ, निर्विकारतेचा..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा