'त्यांचं' भावविश्व..
आजींनी मला असं काही सांगावं हे पूर्णपण अनपेक्षितच. पण त्यांनी बोलताबोलता त्यांच्या नातेवाईकांच्या फोनची यादीच माझ्या हातात ठेवली,म्हणाल्या,'हे काही जवळचे नातेवाईक आहेत, मला काही झालंच तर यांना फोन कर...' काही क्षण मी काहीच बोलू शकले नाही.. मला खूप वाईट वाटलं, पण वस्तूस्थितीचं भान माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त असल्याचं मला जाणवलं. आजी एकट्याच राहतात. त्यांचे नातेवाईक बरेच आहेत, पण ते आपापल्या कामात व्यग्र!
ह्या आजींचं वय साधारण 77-78 असेल. पण त्या कायम म्हणतात "आम्ही म्हातारी माणसं म्हणजे, 'असून अडचण नसून खोळंबा', त्यांच्या वाक्यानं वाईट वाटलं, पण हे खरय.. ही वस्तूस्थितीच आहे. मुलगा आणि सुनेला कुठेतरी बाहेर जायचंय आणि मुलांना बरोबर न्यायचं नाहिये, अशा वेळी मुलांना सांभाळायला घरात आजी-आजोबा हक्कानं घरात असावेत असा आदेश असतो, तर जेंव्हा घरी कुणीतरी पाहुणे येणार असतात अशा वेळी घरात म्हातारी माणसं अडचण वाटूलागतात. हे कटू सत्य आज अनेक घरांत आपल्याला पाहायला मिळतंय. यावर उपाय किंवा त्याला पर्याय म्हणून आपण पाहतो वृद्धाश्रमांकडे. सध्या ज्या धावत्या जगात आपण वावरतोय त्या जगात असे अनेक लोक आहेत,ज्यांचा तसा या धावपळीशी काहीच संबंध नाही. ते त्यांच्या ठरलेलल्या वेगाप्रमाणे धावतायत, खरंतर चालतायत असं म्हणायला हवं. कारण एकतर तेरिटायर्ड आहेत किंवा खूप आजारी असल्यानं एका जागी पडून आहेत, जे स्वतःचे रोजचे विधी सुद्धा एखाद्याच्या सहाय्याशिवाय करु शकत नाहीत. त्यामुळेच किंवा इतर अनेक कराणांमुळे वयस्कर लोक आज अनेकांना घरातली अडचण वाटते. बरेचदा मुलांची बाजू ऐकल्यावर लक्षात येतं की, वयापरत्वे काही वयस्कर मंडळींचा हट्ट वाढतो, समजून घेण्याची वृत्ती बरेचदा कमी होते, आपला हेका कायम ठेवत त्यांना अजूनही (मुलगा कर्ता-सवरता झाल्यावरही) घरावर आपलंच वर्चस्व असावं असं वाटतं. आणि घरातल्या सुनेवर अविश्वास दाखवत सासूबाईंनाही स्वयंपाक घर सोडवत नसतं. हि विधानं सर्व वयस्क लोकांच्या बाबतीत खरी नसली तरी, अनेकांच्या घरातल्या या समस्या आहेत. पण पुन्हा विचार येतो की सरत्या काही काळात त्यांना न दुखवता दोघांच्या सोयिने मार्ग निघतो, तो वृद्धाश्रमाचा. कारण आयांना नोकरी करुन आपल्या मुलांना सांभाळायला ठेवण्यासाठी पाळणाघर असतं, (जिथे मुलांवर आजी-आजोबांप्रमाणे 'सोकॉल्ड' जुनाट संस्कार होत नाहीत), स्वयंपाकासाठी बाई असते, जी घरातल्या इतर बाबीत लुडबूड करत नाही. आजोबा काम नसल्याने घरातल्या इतर गोष्टीत नको तितके गुंतून चौकश्या आणि कामापेक्षा मुलांसमोरच आरडा ओरडा करतात, जे कोणत्याही मुलाला फारसे पसंत नसते. त्यामुळे आजी-आजोबांची लुडबूड नसलेलीच बरी असे घरातल्या कर्त्यांना वाटत असते. आजी एकट्या राहातात, पण स्वाभिमानाचं आणि समाधानाचं जीणं जगत आहेत. हां, आता त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या पाठीमागे जास्त त्रास नको म्हणून त्या काही सोय करत आहेत तर तो त्यांचा सूज्ञपणा सर्वांच्याच फायद्याचा आहे. आजींच्या एका वाक्याने वृद्धापकाळातल्या अनेकांच्या समस्या पटापट नजरेसमोरुन गेल्या. पण खरंच पुन्हा मनात विचार येतो, हालाखिचं आणि कुणाची बोलणी ऐकत जगण्यापेक्षा आपल्याच वयाच्या लोकांसह, मोहपाशातून बाहेर पडून वृद्धाश्रमरुपी सन्यासाश्रम स्वीकारला तर वाईट नाही. कारण जो झोपलाय त्याला उठवणं सोपं आहे, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवण्याचा खटाटोप तरी कशाला करायचा?

Akhadyachya bhumiket jaaun tu tyachi paristhithi jaanun ghetes, this is u r assets...chaan observation keles...asech lihit ja....- Nityanand
उत्तर द्याहटवाधन्यवाद नित्यानंद!
उत्तर द्याहटवा