पोस्ट्स

भारताची आन बान शान अखंड राहणार

इमेज
 पण माझे डोळे का पाणावले? कारण मी त्यांचं मिठ खल्लंय आज प्रत्येकाच्या जेवणातही टाटा आहेतच. कारण मिठा पासून, चहा, स्टील, मोठाले रस्ते आणि त्यावरून धा वणारी वाहन असं सगळं काही भारतात टाटामय आहे.  अन्न वस्त्र निवारा आणि प्रवास अशा माणसाच्या सर्व गरजा ओळखून त्या सर्व क्षेत्रात आपली छाप सोडणारी संस्था म्हणजे टाटा! आणि याच समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा. पण हे जाज्वल्य व्यक्तिमत्व हरपलंय. गरज असेल तिथे कठोर पण मनाने हळवे, सोज्वळ, सात्विक आणि कर्तव्यनिष्ठ असं हे व्यक्तिमत्व.. देशावर आलेलं संकट म्हणजे जणू आपल्या घरावर आलेलं संकट असं मानून त्यांनी आजवर प्रत्येक गरजेच्यावेळी मदतीचा हात दिलाय. संपत्तीला टाटा ट्रस्टमध्ये विलीन करणारे असे क्रांतीसूर्य होणे नाही.#टाटा #tata #रतनटाटा #tataindustries  टाटाच्या जवळपास १०० कंपन्या आहेत आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात टाटा समूहाच्या कंपन्या पसरल्यात. भारता पाठोपाठ अमेरिका आणि इंग्लंड मध्ये टाटाची उत्पादनं सर्वात जास्त वापरली जातात. एकूण १५० देशांमध्ये त्यांची उत्पादने गेल्या अनेक वर्षांपासून वापरली जातात. रतन टाटा यांचं वैशिष्ट्य म्हणजे कल्पक...

राजे मोठा प्रमाद घडला.. जमलं तर माफ करा

इमेज
 महाराज.. महाराज.. मालवण मध्ये मोठ्या दिमाखात तुमचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. स्वतः पंतप्रधान आले, नाविक दलाने संचालन केले. कित्ती कित्ती तो देखणा सोहळा केला. तुमच्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे पाहात उभा असलेला तुमचा पुतळा अनेकांचे लक्ष वेधत होता. मलवणातल्या नाविक दलाने म्हणे सगळ्या परवानग्या अशा फटा फट मिळवल्या होत्या. आमच्या राज्य सरकारनेही कोणती कसूर ठेवली न्हवती. कसं अगदी एखाद्या दिवा स्वप्नं प्रमाणे झर झर् घडत गेलं.. ना कुठला अडथळा ना कुणाची आडकाठी.. आता तुमचाच पुतळा म्हंटल्यावर त्याला विरोध तरी कोण करणार? कुणाची असेल बिशाद की असा पुतळा उभारणीला विरोध करेल? पाहता पाहता तुमची मूर्ती बनली काही महिन्यातच.. आणि चबुतरा बांधला.. पंतप्रधान यांची मलवणात यायची तारीख ठरली अन् लगबग आणखीनच वाढली.. बघता बघता पुतळा तयार झाला. फारसा तुमच्या सारखा वाटत नव्हता म्हणे तो, काहीतरी वेगळा वाटतोय असं अनेकांनी बरेचदा सांगितलं म्हणे, पण उपयोग काय? पुतळा विराजमान झाला होता..  एका बाजूने आरबी समुद्रातून येणाऱ्या फेसाळत्या लाटा आणि तेवढ्याच वेगाने वाहणारे खारे वारे, बाजूने माडाची डोलणारी झाडं, समुद्राच...

सांगली कोल्हापूरच्या पूराची कविता

इमेज
  २०१९ सालीची कोल्हापूर सांगलीची स्थिती वर्णन करणारी कविता - सांगली कोल्हापूरला जणू नजर‌च लागली नजर जाईल तिकडं बगा हाय, पाणीच पाणी व्हय की व्हयकी म्हणणारी आता नाय की नाय की करू लागली चांंगली चांगली म्हणता यंदा कृष्णामाई वंगाळ वागली तीरावरच्या लेकरांना लगबगीनं भेटाय आली पण लेकरांसंगं घरादारात कृष्णामाई लईवेळ रमली पावन केलीस भूमी माझी तुझ्या पावन स्पर्शानं पण गुरं-ढोरं-बकऱ्या-मेंढरं वडूनच नेलीस जोरानं बघता बघता घरला माझ्या पडला तुझाच घेरा सगळं सोडून बेघर झाला प्रत्येक घरचा राजा पाया पडतू हात जोडतू का बाई कावलीस आमच्यावर तुझ्यामुळच तर निवांत जगलो, पण घेतलस आता फैलावर लई कमवलं तुझ्या साक्षीनं, आता झालो कफल्लक परत शून्यात नेऊन ठेवलस वाढली जीवाची धकधक कृष्णा माई तुझ्या भेटीनं झाला जीव हा कृतार्थ पुन्हा नव्याने उभे राहाण्या कर आम्हा तू समर्थ, कर आम्हा तू समर्थ! 😢🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽😢 प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक©

राजकारणाच्या केंद्रस्थानी उद्धव ठाकरे

इमेज
  उध्दव ठाकरेंचं पारडं जड! ठाकरे - फडणविसांची एकत्र 'लिफ्टवारी' खूपच बोलकी आणि राजकारणातल्या केंद्रस्थानी आलेल्या उध्दव ठाकरेंचं राजकीय महत्त्व अधोरेखित करणारी आहे. भलेही अजब तुझे सरकार म्हणत अनेकांनी चेष्टा केली असली तरी आजच्या घडीला सर्वांनाच उद्धव ठाकरेच हवे आहेत.. याचं मुख्य कारण पक्ष फुटूनही शिवसेनेचे उबाठा गटाचे ९ तर शिंदे गटाचे ७ खासदार निवडून आलेत. म्हणजे खरंतर राज्यातला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस (१३ आणि १ अपक्ष असे १४ खासदारांसह) मोठा ठरला असला तरी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मिळून १६ खासदार निवडून आलेत.. उद्या जरी हे दोन्ही गट दिलजमाई करत मनोमिलन करत एकत्र आले तर यांच्या जागांमध्ये घसघशीत वाढ होऊ शकते. याचं कारण शिंदेचे खासदार जरी कमी असले तरी त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आलाय. याचाच अर्थ हे एकत्र लढले असते तर कदाचित १६च काय २० पेक्षा जास्त जागा शिवसेनेला मिळू शकल्या असत्या.. आता तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरेंकडे सहानुभूती होती म्हणून त्यांना जागा मिळाल्या.. पण तुम्ही देशातल्या लोकसभेच्या निवडणूक निकालाचे आकडे पाहिले तर अनेक गोष्टी अधोरिखित होतात. आणि शिवसे...

स्वामी जेंव्हा घरी येतात

  अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थांच्या पादुका मुंबईत आल्या आहेत हे कळताच लगबग सुरू होते ती त्या घरी याव्यात यासाठीची.... आणि खरंच त्या गेल्यावर्षीही आल्या आणि या ही वर्षी आल्या. आणि मन प्रसन्न करून गेल्या. यावर्षअनेकांचे सकारात्मक अनुभव फारचबोलके होते.. माझ्यासकअनेकांचे पेंडिंगअसलेली कामं मार्गी लागली... जी कामं आता देवजाणे कधी मार्गी लागतील असं वाटून सोडून दिलेली.. त्याच कामांचे आज अनाहूतपणे फोन आले आणि अनेक वर्षांचे अडकलेले पैसे मिळणार असं सांगितलं, तर कोणाचे पेंडिंग कामं मार्गी लागली, तर कोणाचे प्रतिक्षा यादीतले नाव पुढे सरकले.  आज खरच कोण भाग्योदय माहिती नाही. पण जेंव्हा स्वामी घरी येतात, तेंव्हा ते केवळ सकारात्मक ऊर्जाच नव्हे, तर आम्हासर्वसामान्यांनाही कााहीतरी देऊनच जातात... फक्त आपली सगळी कवाडं खुली हवीत. स्वामी रित्या हाती येत नाहीत आणि रित्या हाती जात नाहीत. त्यामुळे ते देतातच. खऱ्या अर्थाने देणारे ते एकटे असले तरी आमीच समजण्यात दुबळेपणा करतो, म्हणूनच म्हंटलं ना, 'देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी'. 

सात्विक, सोज्वळ, निरागस राम

इमेज
काही मोजकेच क्षण असतात ज्यामुळे तुमचं मन भरून येतं, तुम्ही सद्गदित होता आणि तुमच्या भावना ओतप्रोत होऊन अश्रू रुपानं वाहू लागतात! तिथे दुःख, चिंता, भय, कष्ट याचा लवलेशही नसतो, पण मन मात्र सुखचित्त होऊनही डोळे डबडबतात. मन एकचित्त होऊन विलक्षण क्षणाची अनुभूति घेतं, हे सगळं वर्णन खरंतर तोकडं पडतंय. पण आज खरंच श्रीराम दर्शनाने पहिल्यांदा डोळे भरून आले.. कदाचित माझ्यातील कीर्तनकार जागी झाली. मी B.Com च्या पहिल्या वर्षात शिकत असताना, दादा वेदक नावाचे वि.हि.प. चे  अधिकार क्षेत्रातील पुण्यातील ग्रहस्त कीर्तनाच्या निमित्ताने भेटले होते, साल २००१-०२ असेल. तेंव्हा मी अतिशय त्वेशाने त्यांना विचारलं होतं, तुम्ही एवढे मंदिरासाठी आग्रही आहात, तर कधी होणार राम मंदिर? त्यावर त्यांनी माझ्याकडे पाहून सांगितलं होतं, बाळ, आम्ही सुद्धा गेल्या काही वर्षांपासून याचंच उत्तर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहोत. माझं त्या उत्तरानं अजिबात समाधान झालं नाही, पण कधीतरी ते नक्की होईल असं मनाला चाटून गेलं... आज त्या क्षणाची साक्षिदार tv9च्या निमित्ताने होऊ शकले हे माझं अहोभाग्यच! रामपर्वाचे साक्षिदार! सात्विक, सोज्वळ, निरा...

वंदे मातरम्

 सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम् शस्य-श्यामलाम् मातरम्॥ वन्दे मातरम्॥ १॥ शुभ्र-ज्योत्सनां पुलकित यामिनीम् फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम् सुहासिनीम् सुमधुर-भाषिणीम्। सुखदाम् वरदाम् मातरम्॥ वन्दे मातरम्॥ २॥ कोटि-कोटि कंठ कल-कल निनाद कराले कोटि-कोटि भुजैर्धृत खरकरवाले, अबला केनो माँ एतो बोले बहुबल धारिणीम् नमामि तारिणीम् रिपुदलवारिणीम् मातरम्॥ वन्दे मातरम्॥ ३॥ तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणा: शरीरे बाहु ते तुमि मां शक्ति हृदये तुमि मां भक्ति तोमारइ प्रतिमा गङि मंदिरे मंदिरे॥ वन्दे मातरम्॥ ४॥ त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीम् कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वां, नमामि कमलाम्। अमलाम्, अतुलाम्, सुजलाम्, सुफलाम्, मातरम्॥ ५॥ श्यामलाम्, सरलाम्, सुस्मिताम्, भूषिताम् धरणीम्, भरणीम्, मातरम्॥ गवन्दे मातरम्॥ ६॥.