सात्विक, सोज्वळ, निरागस राम
काही मोजकेच क्षण असतात ज्यामुळे तुमचं मन भरून येतं, तुम्ही सद्गदित होता आणि तुमच्या भावना ओतप्रोत होऊन अश्रू रुपानं वाहू लागतात! तिथे दुःख, चिंता, भय, कष्ट याचा लवलेशही नसतो, पण मन मात्र सुखचित्त होऊनही डोळे डबडबतात. मन एकचित्त होऊन विलक्षण क्षणाची अनुभूति घेतं, हे सगळं वर्णन खरंतर तोकडं पडतंय. पण आज खरंच श्रीराम दर्शनाने पहिल्यांदा डोळे भरून आले.. कदाचित माझ्यातील कीर्तनकार जागी झाली.
मी B.Com च्या पहिल्या वर्षात शिकत असताना, दादा वेदक नावाचे वि.हि.प. चे अधिकार क्षेत्रातील पुण्यातील ग्रहस्त कीर्तनाच्या निमित्ताने भेटले होते, साल २००१-०२ असेल. तेंव्हा मी अतिशय त्वेशाने त्यांना विचारलं होतं, तुम्ही एवढे मंदिरासाठी आग्रही आहात, तर कधी होणार राम मंदिर? त्यावर त्यांनी माझ्याकडे पाहून सांगितलं होतं, बाळ, आम्ही सुद्धा गेल्या काही वर्षांपासून याचंच उत्तर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहोत. माझं त्या उत्तरानं अजिबात समाधान झालं नाही, पण कधीतरी ते नक्की होईल असं मनाला चाटून गेलं... आज त्या क्षणाची साक्षिदार tv9च्या निमित्ताने होऊ शकले हे माझं अहोभाग्यच!
रामपर्वाचे साक्षिदार! सात्विक, सोज्वळ, निरागस रामलला...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा