श्री राम आम्हाला देतो।। निखळ आनंद। समाधान। संतुष्टी

श्री राम आम्हाला देतो।। प्रत्येक मनुष्य आपल्या कुवती प्रमाणे, म्हणजे (शारीरिक,आर्थिक, मानसिक, वैचारीक इ. इ.) कार्य करत असतो. पण खरच तो जे कार्य करतो त्यात तो समाधानी असतो का..? आणि असला तरी किती समाधानी असतो...? समाधानाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी मात्र तरीही एके ठिकाणी कुठेतरी ती समानतेवर येतेच. आता माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर, काम करताना मनासारखं काम झालं की मला फार बरं वाटतं, पण म्हणून मी समाधानी असतेच असं नाही, मात्र तेच मला एखाद्या आजी वा अजोबांनी रस्ता क्रॉस करुन देता आला तरी खूप समाधानी असल्यासारखं वाटतं. मी शाळेत असताना मला शाळा सुटण्याच्या सुमारास एक जख्ख म्हाताऱ्या आजी भेटायच्या पांढऱ्या रंगाची, त्यावर चॉकलेटी किंवा फेन्ट गुलाबी, हिरवी फुलं असलेली साडी नेसलेल्या, वय साधारण 70च्या आसपास, चेहेऱ्यावर वयाची जाणीव करुन देणाऱ्या सुरकुत्या, पांढऱ्या केसांचा छोटासा अंबाडा, उंची जेमतेम चार-साडेचार फूट, हातात काठी आणि छोटीशी पिशवी, त्यात जपाची माळ, फुलं, खडिसाखरेचा छोटा डबा असायचा. आणि त्या नेमक्या कुणाची तरी वाट पाहत उभ्या असायच्या.(अर्थातच क्रॉस करुन देणारं कोणीतरी भेटेल ...