सरकार आता तरी जागं होणार आहेय का?

(२००९ साली स्टार माझात असताना लिहिलेला हा मजकूर आहे, मी तो ब्लॉगवर टाकलाच नव्हता, पण आजही तो तंतोतंत लागू पडतोय..) 3/8/2011 सालातला हा ब्लॉग आहे, यामध्ये ताजवरील दहशतवादी हल्ल्यानंतरचा संदर्भ आणि राजकीय स्थितीवर भाष्य केलं होतं..

सरकार आता तरी जागं होणार आहे का?
 
नाही-हो नाही-हो म्हणत एकदाचा राम प्रधान समितीच्या ६०० पानी अहवालाचा १०० पानी सारांश विधीमंडळात सादर झाला. मात्र यापूर्वीच माध्यमांनी म्हंटल्याप्रमाणे पोलीस आणि प्रशासनातल्या समन्वयाचा आभावच या अहवालाच्या रुपानं पुन्हा समोर आलाय. मुळात 'मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो', हा इशारेवजा संदेश मुंबई पोलिसांना मिळाला होता, मात्र त्याचा योग्य तो अर्थ लावण्यात पोलिस आणि प्रशासन अपयशी ठरलं. आणि हे आता उघडच आहे. 

        मात्र या अहवालाच्या माध्यमातून पुन्हा एक गोष्ट प्रामुख्यानं समोर येतेय आणि ती म्हणजे आपल्या पोलीस दलात एके ४७शी आणि दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी पुरेसा पोलीस ताफा तर नाहीचे पण शस्त्रास्त्रंही अत्यंत अपुरी आहेत. आपल्या पोलीस दलात अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आणि पोलीसांचा ताफा यात वाढ करणं गरजेचं आहे. ही माहिती आज आपल्य समोर येत नाहीये, तर हे सांगणाऱ्या अनेक समित्या होऊन गेल्यात, पण स्वतःला पुढारलेलं राज्य आणि आधुनिक म्हणत उरबडवेगिरी करणाऱ्या सरकारला अजुनही जाग येत नहीये
        एके ४७शी लढताना आपल्या पोलीसांकडे असतात काठ्या आणि जुन्या रायफल्स. अगदी शेंबडं पोरगं पण सांगू शकेल की एके ४७चा सामना काठीशी आणि जुनाट रायफलशी नाही होऊ शकत..पण ही गोष्ट सरकारला कळू नये? आता तरी किमान या गोष्टीकडे सरकारनं गांभिर्यानं पाहणं गरजेचं आहे.
 
         मुळात दहशतवादी हल्ला मुंबईसाठी नवीन नाही यापूर्वी देखील दहशतवादी हल्ले सरकारनं आणि मुंबई पोलिसांनी पाहिले आहेत. मग सरकारनी अजून नवीन शस्त्रास्त्रांची मागणी का केली नाही?, दर आठवड्याला पोलिसांची परेड वा ट्रेनिंग होतं का? आणि पोलिस दलात आवश्यक असलेल्या नवीन ताफ्याची भरती कधी होणार? या प्रश्नांची अजूनही उत्तरं मिळत नाहीये.

 
        कदाचित सरकारचा असा समज झालाय की, हे हल्ले केवळ सर्वसामन्य जनतेवरच होतात आपल्याशी त्याचा केवळ पुढील घोषणांपुरताच संबंध आहे. पण हे दहशतीचं लोण नेत्यांच्या जवळ यायला वेळ लागणार नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावं. त्यामुळं राज्याच्या चिंतेचा देखावा करणाऱ्या सरकारनं, आपली चिता पेटतेय हे विसरु नये.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान