पोस्ट्स

2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेड्यांच्या बाजारातले आपण

    मी पत्रकारितेचंशिक्षण रेत असताना साधारण २००५-०६ साली, त्या दोघांचे भेटणं आणि वेगळ्या स्टाईलने एकमेकांशी बोलणं आता आम्हाला नित्याचं झालं होतं... आणि त्यांना सपशेल टाळणं आणि त्यांच्यातल्या वेगळ्या संबंधांबद्दल आमचं काहीच न बोलणं, न चिडवणं आणि नॉर्मल फ्रेंडप्रमाणे ट्रीट करणं त्यांना फारच त्रासदायक वाटायचं. आणि अर्थातच त्याचा आम्हाला विशेष आनंद वाटायचा...(ते काही वेगळं सांगायला नकोच!) सम्या आणि बिनी हे दोघेही अगदी विरुद्ध म्हणजे विचारांनी नाही तर शरीरानी. बिनी जाडी, गट्टी घाऱ्या डोळ्याची, आणि सम्या मात्र अगदी सापळाच.. ते दोघं असे अचानक जिवलग होण्याचं कारण म्हणजे दोघे अक्षरशः सारख्याला वारखे. एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा. दुसरे कसे मूर्ख आणि आम्हीच कसे शाहणे हे दाखवण्याचा या दोघांचा कायम आटापिटा चालायचा.. अर्थात त्यांना भीक घालणारं तसं कोणी न्हवतं.. आणि जे होते त्यांना लवकरच त्यांची चापलुसी लक्षात येवू लागली.. मग त्यांनीही नाद सोडून दिला.      या दोघांचा घरोबा आता फारच वाढला होता, लवकरच हे दोघं लग्न करणार अशा चर्चांना ऊत आला होता.. तिला बारिक करण...

राज्य 'ना'लायकांचे..

इमेज
भुक्कड राजकारण्यांच्या थुकरट कामगिरीमुळे आपल्या राज्याचं नाव खराब होतंय.., पण बेशरम राजकारण्यांना त्याचं काहीच नाही.. म्हणतात ना..'निलाजऱ्याची बलाईदूर आणि हजार खेटरं ताजा नूर..' थोडक्यात काय, तर सगळ्याच पक्षांचा मंत्र असा की, 'घोटाळे करा पण ते पचवायला, लपवायला शिका..' (टुकार, भुक्कड, बोलबच्चन, बिनकामाचे, निर्लज्ज.... तसं हे देखील कमीचे.. असो.. सार्वजनिकरित्या इतकंच पुरेसंय.... ;-)

लोकसभेतला सावळा गोंधळ

इमेज

Shame on them...

इमेज

माझ्या गावचा वारणेचा वाघ...

इमेज
    हिंदकेसरी मारूती मानेंची तशी वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. पण मारुती माने हे आपल्याच गावचे म्हणजे कवठेपिरानचे असल्यानं मला आणि माझ्या भावाला त्यांचा कोण अभिमान..! भले आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही तरीही त्यांच्याबद्दल अभिमान अजुनही कायम आहेच..     ऑफिसमध्ये पाऊल टाकलं आणि मारुती माने गेल्याची बतमी पाहिली. लागलीच मी बाबांना फोन केला... बाबा अंत्यदर्शनाला आणि अंत्यविधाला गेले.. खरंतर मी नुसतीच नावचीच कवठेपिरान या गावची, पण बाबांचा, माझ्या चार काकांचा आणि दोनही आत्यांचा जन्म कवठेपिरानचाच. त्यांची शिक्षणंही तिथेच झाली.. पण बाबांकडून, काकांकडून मारुती मानेंचं नाव बरंच ऐकलं होतं... कवठेपिरान ह्या़ गावाची ओळख म्हणजे गुंडांचं गाव... पण मारुती मानेंनी ती ओळख बदलली.. हिंदकेसरी मारुती मानेंचं गाव आणि अलिकडेच कवठेपिरान हे ग्रामस्वच्छाता अभियानाअंतर्गत पहिल्या क्रमांकाचं आलेलं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली ती त्यांच्यामुळेच. या मारुती मानेंनी हालाखीच्या परिस्थितीतून अक्षरशः शून्यातूनच सगळं ऐश्वर्य उभं केलं...     हे सगळं मला माहिती अस...

सोप्पा उपाय आणि योग्य वेळ

      सर्वांना आपल्यासारखाच तो, किंवा ती असं मानणं किती चूकीचं आहे, हे त्याच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.       झालं असं की ऑफिसमध्ये त्याचं आणि त्याच्या मित्राचं(अर्थात ज्या व्यक्तिला तो आपला चांगला मित्र मानत होता असा..) कडाक्याचं भांडण झालं. चूक नसतानाही त्याला वरिष्ठांच्या जोरामुळे आणि मित्राच्या खोटेपणामुळे बरंच ऐकून घ्यावं लागलं. त्यात त्याची नोकरी जाता-जाता वाचली.. आणि त्याला आयुष्यात इतका जबरदस्त वाईट, पण चांगला धडाच मिळाला जणू.. ज्याच्यावर आपला चांगला सहकारीच नव्हे तर चागला मित्र म्हणून त्यानं विश्वास ठेवला त्यानं त्याचा केसानं गळा कापला. हे सगळं सांगताना अमनला हुंदका आवरेना. आणि अमनला समजावणं मला फारच कठीण झालं.. कारण त्याला एकवेळ नोकरी गेली असती तरी चाललं असतं, पण हे असं, कारण नसताना भलतं-सलतं ऐकून घेणं नको होतं.. पण तेच घडलं होतं. आणि त्याच्या 'सोकॉल्ड' मित्रानं त्याचं नाव जितकं खराब करता येईल तितका प्रयत्न केला होता. हे सगळंच त्याच्यासाठी अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. यातून बाहेर पडण्याचा त्याचा प्रयत्न स...

माझी आजी

इमेज
माझी आजी....       नुसतं आजी जरी म्हंटलं, तरी डोळ्यातलं पाणी मी थांबवू शकत नाही.. तिचा जन्म १९१४ सालचा, ९६ वर्षाची होती ती.. ती कधीतरी आम्हाला सगळ्यांना सोडून जाणारच याची कल्पना असूनही मला तिच्या जाण्यानं जो धक्का बसला, त्यातून बरेच महिने सावरण्याचा प्रयत्न करत होते.. आजही मी त्या प्रयत्नात यशस्वी झालेय असं मला वाटत नाही. अर्थात मला तिचा सहवास अत्यल्पच लाभला असं म्हणायला हवं.. कारण साधारण ५ वर्ष मला तिचा सहवास लाभला.. आणि ते शक्य झालं माझ्या मावशीमुळे.. (मावशीबद्दल स्वतंत्र लिहावंच लागेल, तर ती कळेल) खरंतर माझी आजी पुण्यात्माच, तिच्यामुळेच मी थोडीफार शांत होऊ शकलेय.       आजीमध्ये इतकेसाऱे गुण होते की तिच्याकडून घ्यावं तितकं थोडंच. अतिशय कुशाग्र, चाणाक्ष, तीव्र स्मरणशक्ती, हसतमुख राहणे, कोणत्याही परिस्थितीत अतिशय शांत राहणारी, सर्वांवर प्रेम करणारी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी माझी आजी.. पाण्याची उपमा तिला चपखल लागू पडू शकते, पाणी जसं कोणत्याही आकारात कोणत्याही रंगात रंगून जातं पण त्याचं अस्तित्व जसं कायम असतं, त्याच प्रमाणे होती माझी आजी. ती मुळ...

आजची पिढी, मनसे आणि सेना

इमेज
      शिवसेनेमुळेच मराठी माणूस मुंबईत टिकून राहीला.. हे वाक्य आपण सर्वांनीच अनेकदा ऐकलंय.. मात्र आता हे वाक्य मागे पडणार असे संकेत मिळू लागलेत.. आमच्या शेजारी ७-८ वर्षांची एक छोटी मुलगी राहते. तिचा गडबड गोंधळ कायम सुरुच असतो, मात्र कालची तिची आरोळी माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण करुन गेली... मनसेचा विजय असो, अशी होती ती आरोळी. सहज मनात विचार आला, माझ्या पिढीला शिवसेना माहिती झाली ती मुंबईतल्या दंगलींमुळे, बाळासाहेबांच्या कुणाची भीडभाड न बाळगता घणाघाती हल्ले करणाऱ्या भाषणांमुळे, शिवसेनेच्या भगव्यामुळे, दिंदुत्वाच्या मुद्दयामुळे...आणि त्या आधीच्यांना ती माहिती होती ती मराठीच्या चळवळीमुळे..पण आजच्या पिढीला शिवसेना माहिती असावी असं काहीच घडत नाहिये.. हे सत्यय... तुलनेत आजच्या पिढीला मनसे माहिती आहे. राज ठाकरे माहिती आहे. याला कारणंही तशीच आहेत. मनसेची मराठी पाट्यांसाठी मुंबईत झालेली आंदोलनं, शाळेतील मराठी भाषा सक्तीसाठी झालेली आंदोलनं( प्रत्यक्ष झालं काही नाही हे आपण जाणतोच) वीज दरवाढीचं आंदोलन आणि त्या पेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राज ठाकरेंची भाषणं ऐकलीयत, त्या...

'त्यांचं' भावविश्व..

इमेज
      आजींनी मला असं काही सांगावं हे पूर्णपण अनपेक्षितच. पण त्यांनी बोलताबोलता त्यांच्या नातेवाईकांच्या फोनची यादीच माझ्या हातात ठेवली,म्हणाल्या,'हे काही जवळचे नातेवाईक आहेत, मला काही झालंच तर यांना फोन कर...' काही क्षण मी काहीच बोलू शकले नाही.. मला खूप वाईट वाटलं, पण वस्तूस्थितीचं भान माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त असल्याचं मला जाणवलं. आजी एकट्याच राहतात. त्यांचे नातेवाईक बरेच आहेत, पण ते आपापल्या कामात व्यग्र! ह्या आजींचं वय साधारण 77-78 असेल. पण त्या कायम म्हणतात "आम्ही म्हातारी माणसं म्हणजे, 'असून अडचण नसून खोळंबा', त्यांच्या वाक्यानं वाईट वाटलं, पण हे खरय.. ही वस्तूस्थितीच आहे. मुलगा आणि सुनेला कुठेतरी बाहेर जायचंय आणि मुलांना बरोबर न्यायचं नाहिये, अशा वेळी मुलांना सांभाळायला घरात आजी-आजोबा हक्कानं घरात असावेत असा आदेश असतो, तर जेंव्हा घरी कुणीतरी पाहुणे येणार असतात अशा वेळी घरात म्हातारी माणसं अडचण वाटूलागतात. हे कटू सत्य आज अनेक घरांत आपल्याला पाहायला मिळतंय. यावर उपाय किंवा त्याला पर्याय म्हणून आपण पाहतो वृद्धाश्रमांकडे. सध्या ज्या धावत्या जगात आपण वावरतोय ...

तुमाला बघून ठरिवलं, पोरीला शिकवनार!

   एक दिवस जांब गावातला..    एक १२-१३ वर्षाचा मुलगा मी दिसले की ओरडायचा 'स्टार माझा.. स्टार माझा' आणि मी त्याच्याकडे पाहून हासत होते, मग तो आपणहुनच जवळ आला आणि म्हणला, "ओ, तुम्ही असताय ना स्टार माझावर.." मी होकारार्थी मान हालवलली, "मी तुम्हाला पाहिलंय स्टार माझावर.., पण मी स्टार माझा पाहात नाही मला पिच्चर खूप आवडतात म्हणून मी स्टार गोल्ड पाहतो..." मी खळखळून हसले...हा संवाद आहे, समर्थांच्या जांब गावतल्या शाळकरी मुलाचा आणि माझा.कीर्तनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळते, तिथलं वातावरण, भाषा, विचार यांचाही थोड्याफार प्रमाणात परिचय होतो.. नुकतंच समर्थांच्या जांब गावला म्हणजेच जांब समर्थ या गावी कीर्तन होतं. तशी मी जांबगावला पहिल्यांदा गेलेली नाही या पूर्वीही मी दोन वेळा जांबगावला गेलीय.. ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवांच्या इच्छेने व कृपेने तिथे जााण्याचा योग आलाय. मात्र गेल्या तीन वर्षात संधी मिळूनही नोकरीच्या रहाटगाडग्यात जाणं शक्य झालं नव्हतं. या वेळी मात्र योग जुळून आला.       जांब हे जालना जिल्ह्यातलं खेडेगांव. १२ते १४ तास लोडशेडींग...