वेड्यांच्या बाजारातले आपण

   
मी पत्रकारितेचंशिक्षण रेत असताना साधारण २००५-०६ साली, त्या दोघांचे भेटणं आणि वेगळ्या स्टाईलने एकमेकांशी बोलणं आता आम्हाला नित्याचं झालं होतं... आणि त्यांना सपशेल टाळणं आणि त्यांच्यातल्या वेगळ्या संबंधांबद्दल आमचं काहीच न बोलणं, न चिडवणं आणि नॉर्मल फ्रेंडप्रमाणे ट्रीट करणं त्यांना फारच त्रासदायक वाटायचं. आणि अर्थातच त्याचा आम्हाला विशेष आनंद वाटायचा...(ते काही वेगळं सांगायला नकोच!) सम्या आणि बिनी हे दोघेही अगदी विरुद्ध म्हणजे विचारांनी नाही तर शरीरानी. बिनी जाडी, गट्टी घाऱ्या डोळ्याची, आणि सम्या मात्र अगदी सापळाच.. ते दोघं असे अचानक जिवलग होण्याचं कारण म्हणजे दोघे अक्षरशः सारख्याला वारखे. एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा. दुसरे कसे मूर्ख आणि आम्हीच कसे शाहणे हे दाखवण्याचा या दोघांचा कायम आटापिटा चालायचा.. अर्थात त्यांना भीक घालणारं तसं कोणी न्हवतं.. आणि जे होते त्यांना लवकरच त्यांची चापलुसी लक्षात येवू लागली.. मग त्यांनीही नाद सोडून दिला.

     या दोघांचा घरोबा आता फारच वाढला होता, लवकरच हे दोघं लग्न करणार अशा चर्चांना ऊत आला होता.. तिला बारिक करण्याचे सम्याचे प्रयत्न सुरु होते. त्याला भीक न घालता ती मस्त बटाटे वडे, समोसे, पिझ्झा, बर्गरवर मनसोक्त ताव मारायची.. त्या दोघांसाठी आमचं आवडीचं गाणं आम्ही त्यांना ऐकवायचो, ते म्हणजे जाड्या- रड्या जोडी छान होती मोठी अक्कलवान...
     पुढे कुठे आणि काय फाटलं देव जाणे, पण अचानक दोघांचं एकमेकांना भेटणं, फिरणं सगळंच बंद झालं..
     काही असो, दोघांनी स्वतःतर एन्जॉय केलंच, पण इतरांनाही थोड्याफार चर्चेला वाव दिला.. आजकाल मंत्री जे करतात, तेच.. चर्चेत राहणं आणि लोकांचं लक्ष वेधून घेणं... यातून त्यांचच हसं होतं... हे मात्र त्या पढत मूर्खांच्या लक्षात येत नाही.. असो, म्हणतात ना एक मूर्ख झाल्याशिवाय इतरांचा फायदा होत नाही..... :)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान