माझी आजी.... नुसतं आजी जरी म्हंटलं, तरी डोळ्यातलं पाणी मी थांबवू शकत नाही.. तिचा जन्म १९१४ सालचा, ९६ वर्षाची होती ती.. ती कधीतरी आम्हाला सगळ्यांना सोडून जाणारच याची कल्पना असूनही मला तिच्या जाण्यानं जो धक्का बसला, त्यातून बरेच महिने सावरण्याचा प्रयत्न करत होते.. आजही मी त्या प्रयत्नात यशस्वी झालेय असं मला वाटत नाही. अर्थात मला तिचा सहवास अत्यल्पच लाभला असं म्हणायला हवं.. कारण साधारण ५ वर्ष मला तिचा सहवास लाभला.. आणि ते शक्य झालं माझ्या मावशीमुळे.. (मावशीबद्दल स्वतंत्र लिहावंच लागेल, तर ती कळेल) खरंतर माझी आजी पुण्यात्माच, तिच्यामुळेच मी थोडीफार शांत होऊ शकलेय. आजीमध्ये इतकेसाऱे गुण होते की तिच्याकडून घ्यावं तितकं थोडंच. अतिशय कुशाग्र, चाणाक्ष, तीव्र स्मरणशक्ती, हसतमुख राहणे, कोणत्याही परिस्थितीत अतिशय शांत राहणारी, सर्वांवर प्रेम करणारी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी माझी आजी.. पाण्याची उपमा तिला चपखल लागू पडू शकते, पाणी जसं कोणत्याही आकारात कोणत्याही रंगात रंगून जातं पण त्याचं अस्तित्व जसं कायम असतं, त्याच प्रमाणे होती माझी आजी. ती मुळ...