स्वतःला आजमवणे सुरु.. अनुभवाची शिदोरी भरतेय...

अनुभवाची शिदोरी भरतेय...
खूप दिवसंपासून काहीतरी लिहायचं असं ठरवतेय.. थोडंसं लिखाणही झालंय पण ते पोस्ट करावं या लायकीचंच मला वाटत नव्हतं. धीर करुन आज पुन्हा लिहायला बसलेय. (ही पोस्ट देखील २०११साली अर्धवट लिहिलेली होती. पण आजही त्यात फारसा बदल झालेला नसल्यानं १४ वर्षांचा उल्लेख करत टाकतेय)
आयुष्यात केवळ चांगलेच लोक भेटावेत असं कधी वाटलंच नाही. कारण माझ्या आसपास मित्र-मैत्रिणींचा चांगल्या नातेवाईकांचाच गराडा होता... पण नोकरी लागली आणि चारच वर्षात मी 'शहाणी' झाले. 
 नोकरीच्या ठिकाणी भेटलेले नाना तऱ्हेचे लोक त्यांचं वागणं एक दाखवणं एक, थोडक्यात 'दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे'. या सगळ्या गोष्टी सुरुवातील मला तशा नवीन होत्या. वाटायचं.. अरेच्च्या अत्ता तर या माणसाने त्याच्याबद्दल इतकं चागलं सांगितलं आणि जशी त्याची पाठ फिरली हा लागला बरळायला.. आश्चर्य वाटायचं, विचित्र वाटायचं.. कुठे येऊन पडले मी असं वाटून कधी कधी पश्चात्तापही व्हायचा.. पण नंतर एक गोष्ट ध्यानात आली की यालाच अध्यात्मात अलिप्तता म्हणतात, आणि तीच शिकायला बहुदा ईश्वरानं हा मार्ग मला दिलाय..आणि एक गोष्ट पक्की समजली हिच खरी दुनिया, खोट्यांची, नकली लोकांची आणि नकलीपणावरच भाळणारी.. खोटं खोटं का होईना दुसऱ्याचं कौतुक करा मग तुम्ही ग्रेट.. पण तेच तोंडावर अगदी घालून पाडून नाही पण खरं बोला की झालं.., मग तुम्ही वाईट. खरं बोलणं लोकांना झोंबतं हेच खरं. असो आजकाल खरं बोलणाऱ्यांची संख्या कमीकमीच होत चाललीय.. कारण माझ्या सारख्यांना खोटं पटत नाही, आवडत नाही आणि जे पटत नाही ते मी बोलत नाही. त्यामुळेच आता खरं बोलून वाईट होणयापेक्षा बोलणंच बंद करावं असं ठरवतेय.. पाहू कितपत सत्यात उतरतं ते.. 

पूर्वी  परीक्षा अगदी नको वाटायची पण आता मात्र स्वतःचीच परीक्षा घ्यायची असं ठरवते, आणि खरोखरीच परीक्षा सुरु होते. आणि मला परीक्षा  द्यायला आवडतं सुद्धा. सध्या परीक्षा सुरुय ती शांत राहण्याची. पहायचंय मी या परीक्षेत कितपत खरी उतरतेय. 
आता १४ वर्षं झाली पण लोक कसे असतात याचा चांगला-वाईट अनुभव मला गेल्या 14 वर्षांच्या काळात चांगलाच आलाय. चांगले लोक आजही संपर्कात आहेत आणि आसपास बऱ्याच चांगल्या लोकांचा वावरही आहे. त्यामुळे हुश्श.. परीक्षा संपत नसतात हे मात्र खरं. कारण देव बहुदा अशाच लोकांना जन्माला घालतो ज्यांची परीक्षा देण्याची लायकी आहे. 'त्याची'च कृपा की मला आजही चांगल्या वाईटाची जाण आहे. आणि मला जाणणारा समंजस समाज आसपास आहे! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान