कविता - त्यांनी मला आपलं मानलं यातच सारं काही आहे

कोणाबद्दल विचार करावा असं कोणी नाही
त्यांनी माझा विचार करावा असंही कोणी नाही

जीवनाच्या वाटेवरती भेट झाली त्याची
पण मला त्याने आपली म्हणावं अशी मी नाही

प्रेमाच्या वाटा फार अवघड असतात म्हणतात
पण माझ्यासाठी याच वाटा सुखकर बनून जातात

प्रेम करणारं नसलं कोणी तरी मला चालेल
कारण प्रेमाची व्यख्या बनवणारा देव माझा आहेय

इवल्याशा या दुनियेमध्ये मी कोणाची तरी आहे
त्यांनी मला आपली मानलं यातच सारं काही आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान