'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान
मी कधीच 'अ' तुकडीत न्हवते, आणि त्याचा मला सार्थ अभिमानही आहे..!! पहिली ते चवथी 'म.के. अठवले' शाळेत मी 'क' तुकडीत आणि नंतर सिटी हायस्कूलमध्ये गेल्यावर मला 'ड' :P तुकडी मिळाली होती. अर्थात मार्कांवर आधारित फक्त एकच तुकडी होती आणि ती फक्त चवथीच्या मार्कांवर आधारित होती त्यामुळे साले 'अ' ला जे चिकटले ते चिकटलेच लेकाचे.. अर्थात मला त्यांचा हेवा वगैरे कधीच वाटायचा नाही, उलट त्या वर्गातल्या ढ मुलांचीच फार कीव यायची.. कारण अ तुकडीला शिकवणारे सर्वच 'मास्तर' हि मुलं हुशारच आहेत असा (आ)ग्रह ठेवून शिकवत असत. असो. त्यांचं दुःख त्यांच्यापाशी.. त्यातच एकाच वर्षासाठी मला पुण्यातल्या शाळेत जायला मिळालं ती म्हणजे 'रेणुका स्वरुप'.. ती शाळा मला खरंचच खूप आवडली.. फक्त गाणं की खेळ या माझ्या कन्फ्युजनला घाणेकर बाईंनी फुल स्टॉप देत भरड्या आवाजात सांगितलं.. "काही खेळाबिळात जाऊ नको तुझा आवाज चांगलाय इकडेच येत जा प्रॅक्टिसला.." तेंव्हा मी बऱ्यापैकी गुणी म्हणजे थोडक्यात नंदिबैल असल्यानं मला नेमकं काय आवडतं हे कळलंच नाही.. अर्थात हे मी ११वीत जाईपर्यंत होत होतं... बारावीत मला धूसर मार्ग दिसला आणि उशीरा का होईना मी तो पकडला..
थोडक्यात सांगायचं तर मला अ तुकडीतली मुलं नक्कीच कुणीतरी मोठी होणार, यांचं नाव टीव्ही-रेडिओवर ऐकल्यावर आपण घरच्यांना म्हणणार की, "पहा.. हा.. माझ्या शाळेत होता/ होती.." पण कसचं काय, उलट मलाच असं कळलंय की 'अ' तुकडीतली तथकथित हुशार मुलं मला मध्यंतरी चॅनेलवर पाहून घरच्यांना सांगत होती म्हणे की, 'ही आमच्या शाळेत होती...' हा हा, मला फार मजा वाटते असं काही ऐकलं की. आणि म्हणूनच 'अ' तुकडीत नव्हते याबद्दल बरंही वाटतं.. अर्थात मी अ तुकडीत नसल्यानं माझा एक तोटा झाला, तो म्हणजे- शाळेच्या स्नेहसंमेलनात कोणत्याच नाटकात कोणतीच भूमिका मला कधिच मिळालीच नाही. शिक्षकांना वाटायचं की नाटकात काम करणाऱ्याचं पाठांतर चांगलं हवं.. आणि अ तुकडीतले 'कुथाट' त्यांना सहजच मिळून जायचे.. त्यामुळे बाकीच्या तुकड्यांमधले चंगले 'खरेखुरे कलाकार' त्यांना कधीच नकोच असायचे.. असो, तशी शाळेतली नाटकंही फार बरी नसायचीच (हे आता लक्षात येतंय, तेंव्हा उगाचच वाईट वाचायचं..)
आता मुद्दा असा की माझ्या आईच्या आणि सर्व शिक्षकांच्या मते (माझी आईही शिक्षिकाच असल्याने), - पहा ती अ तुकडीतली मुलं कशी हुशार असतात, अभ्यास करतात, ब्ला ब्ला ब्ला.... त्यातच माझा भाऊही अ तुकडीत होता.. आणि तो जरा जास्तच हुशार असल्याने त्याला खूप अभ्यासाची किंवा कुथाटगिरी करण्याची गरज पडत नसे, पण माझ्या आईला मात्र मी मठ्ठ, ढ गोळा आहे असं वाटत असल्याने सतत अभ्यासच करत रहावा असं वाटे.. अर्थात मी आधी म्हंटल्याप्रमाणे मलाही हुशार मुलांचीच नावं झळकणार असं वाटत असे, पण प्रत्यक्षात झालंय भलतंच. माझ्या वर्गात एक अतिशय ढ किंवा ला़डावलेला मुलगा होता.. जो पूर्ण वर्गावर दादगिरी करायचा.. तो पास व्हावा म्हणून त्याचे वडिल त्याला लई भारी आमिषं दाखवायचे..उदा. तू ८वी पास झाला तर तुला बुलेट घेऊन देईन इ. (आठवितल्या पोर्ट्याला बुलेट..) म्हणजे तो साधारण किती अवास्तव लाडावलेला असेल याची तुम्ही कल्पना करु शकता पण आज तो उपमहापौर झालाय..
माझं आणि त्या तथाकथित अभ्यासात ढ असणाऱ्या दोघांची उदाहरण पुरेशी बोलकी आहेत.. आज अ तुकडीतला एखादाच मुलगा त्याला ज्याची खरंच आवड आहे ते उत्तम करत असेल आणि तेच करिअर म्हणूनही निवडलं असेल.. मला खात्रीय की मी चुकूनजरी माझ्या शाळेतल्या शिक्षकांना भेटले तर माझा 'ढ'पणा दूर ठेवून ते माझी जबरदस्त प्रशंसाच करतील, ज्याची मला आता मुळीच गरज नाही!! (काही आवडीच्या शिक्षकांनी माझा नंबर माझ्या आईकडून घेऊन आवर्जून फोन केलायही.)
पण मी आणि माझा ढ मित्र लोकांमध्ये 'अ'तल्या मुलांपेक्षा 'वेलनोन' आणि प्रशंसेस पात्र आहोत हेच आम्हा 'ढ' लोकांचं श्रेय म्हणावं लागेल!!
ता.क. - या लिखाणामुळे चुकून माकून 'तेंव्हा' चुकून 'अ' तुकडित असणारे विद्यार्थी दुखावले गेले असतील तर हे तुमच्यासाठी नाहीच असं समजा..!! :P
ता.क. - या लिखाणामुळे चुकून माकून 'तेंव्हा' चुकून 'अ' तुकडित असणारे विद्यार्थी दुखावले गेले असतील तर हे तुमच्यासाठी नाहीच असं समजा..!! :P
क्या बात..मी मुंबईतून पुण्यात शिकायला गेलो आणि पहिली ई मध्ये भरती झालो...खरंतर मी मुंबईतल्या माझ्या शाळेत ज्युनिअर आणि सीनिअर के.जी मध्ये पहिला आलो होतो...पण पुणेकरांनी आल्या आल्याच माझा अपमान केला. पण तो अपमान गिळून मी नंतर चार वर्षांनी का होईना...आमच्या शाळेतली हुशार मुलांची तुकडी असलेल्या 'ब' तुकडीत गेलो....पण माझं मन फारसं तिथे रमलं नाही...आजही आम्ही बरेच जण कॉन्टॅक्टमध्ये आहोत...पण आमच्या मध्ये हुशारी हा क्रायटेरिया आता नाही आहे...मजा आली वाचताना...शाळेतले लय भारी दिवस आठवले....
उत्तर द्याहटवामस्तच... तुझ्याही शाळेतल्या 'रम्य' आठवणी नक्की लिही.. तेवढंच 'अशा' वातावरणात थोडं 'रिफ्रेश' होता येईल :P
उत्तर द्याहटवाAga to Mulga naggarswak nahi....
उत्तर द्याहटवाUp Mahapaur zalay Sangali Shaharacha!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हो माझ्या वर्गातल्या अभिजीत सुर्यवंशीने मला फेसबुकवर सांगितलं, बदल केला सुद्धा
उत्तर द्याहटवाधन्यवाद
प्रज्ञा छान लिहिले आहेस. मी शाळेत नेहमीच हुशार तुकडीत होतो पण मला मार्क हुशार मुलांसारखे कधीच मिळाले नाहीत. स्वानंदने त्याचा अनुभव अजून विस्तारून लिहायला हवा. कारण माझ्या मते तो अजूनही शालेय जीवनात आहेत.
उत्तर द्याहटवासुजय
A - Attitude
उत्तर द्याहटवाB - Best
C - .....
D - .....
E - .....
F - .....
Rikamya jaga bhara.....
फ़ारच छान..! शासनाने कुमारभारती मध्ये हा धडा include करावा!!
उत्तर द्याहटवाखरं तर चांगली कल्पनाय आषिश.. पण मुख्यत्वे आपल्या शिक्षकांनी बोध घ्यावा इतकंच..
उत्तर द्याहटवापण धन्यवाद!
आपल्या लेखणी ने आम्हाला पण मनोगत व्यक्त करण्यास प्रेरित केले . माझ्या शाळेत संस्कृत आणि मराठी उर्फ A आणि B अशा दोन तुकड्या होत्या , मी ५०% मिळवणारा होतो त्यामुळे पालकांनी मला B तुकडीत लोटून दिले ! प्रत्येक unit टेस्ट मध्ये एका तरी विषयाचा दोन वेळा अभ्यास करायचोच ! शिक्षकांना रोजगार मिळावा या हेतूने मी हा उपक्रम college मध्ये पण राबविला . शाळा बरी होती मात्र काही शिक्षिका मारकुट्या होत्या . Welcome मधला dialogue त्या शिक्षिकांना अर्पित करतो , "मेरी एक टांग नकली हैं , मैं हॉकी का बहुत बडा खिलाडी था , एक दिन मेरी किसी बात से उदय भाई को गुस्सा आया और मेरे ही हॉकी स्टिक से मेरी टांग के चार तुकडे कर डाले , लेकिन दिल के बहुत अच्छे हैं … " Now I know why my school's abbreviated name was P.E.S.T (People's Education Society Thane)
उत्तर द्याहटवाHa ha ha
हटवा