बाकी सब झूट है...
(19 January 2011साली लिहिलेलं) आपल्याला वाटतं मी करतो तेच खरं, आणि तेच योग्य.... मी म्हणेन ती दिशा... त्यातच आपण म्हणलेली एखादी घटना-गोष्ट योग्य ठरली किंवा अचूक असेल तर काय विचारायलाच नको.. माझ्यासारखा मीच... मीच म्हंटलं होतं त्याला, की असं कर, असा वाग...
आपण फार अडकलेले असतो आपल्याच विश्वात.. त्यामुळेच आपण करतो तेच आणि तेच योग्य असं वाटतं.. पण आपण काहीच करत नसतो, याच अनुभव माझे काही परिचित व नातेवाईक घेत आहेत... इतकं नेटकं आयुष्य की त्यात कोणत्याच प्रकारचा अडथळा येण्याची सुतराम शक्यता नाही. सगळं कसं नीटनेटकं, टापटीप आणि व्यवस्थित.. फार कमी लोकांना असं आयुष्य उपभोगता येतं. आपल्या भारतात अशी अनेक घरं आहेत, जी सुखासीन आयुष्य जगतात.. पण याच्या आयुष्याची मला फारशी कल्पना नव्हती पण मला तशी कल्पना येईपर्यंतच त्यांच्या आयुष्यात अकस्मात कोणाचीतरी वक्र दृष्टी पडल्याप्रमाणे संकटं कोसळू लागली... इतकी की पहिली घटना घडून गेल्यावर ती निवळण्याच्या आतच पुढची घटना आ वासून उभी....
आपल्या वैऱ्याच्या आयुष्यातही असं घडू नये असं काहीतरी घडतंय... खरोखरीच काही गोष्टी अतर्क्यच असतात, बुद्धीला पटणार नाही पण असं घडतं की बुद्धीचा आणि आपला काही अर्थाअर्थी संबंध नाही असं वाटू लागतं...
काही लोक भविष्यवर विश्वास ठेवत नाहीत, काही लोक आपण बदलणारच नाही या मतावर ठाम असतात, काही लोकांनी मनानेच काही ग्रह करुन घेतलेले असतात, आणि आपल्या कर्तृत्वावर विश्वास असावा वगैरे.. गप्पा मारतात,. अर्थात कर्तृत्वावर विश्वास असायलाच हवा पण अनाठायी विश्वास काहीच कामाचा नाही..
कारण काही ठिकाणी कर्तृत्वही कूचकामी ठरतं.., बरं तिथे कोणा इतरांच्या नावाने शंख करावा अशीही परिस्थिती नसते...
मुळात आपलं आयुष्यच फार छोटं आहे, तोकडं आहे म्हंटलंतरी हरकत नाही काहिंना तेही खूप वाटतंच.. पण इथे कोणाचच आयुष्य आणि त्याची कार्य माहिती नसल्याने (प्रत्येक मनुष्य काहीतरी भरीव कामगिकी करण्यासाठीच जन्माला आलाय असं गृहित धरुन ते तोकडं आहे असं म्हणत आहे. अशा आयुष्यात सुख-दुःखाच्या हिंदोळ्यावर माणूस झुलतोय.. सुखात सर्वशक्तीमान-सर्वेश्वराची आठवण नाही आणि दुःखात मात्र त्याच्या नावानं खडे फोडणं, हा आपला बाणा... जर तुमच्या सुखासाठी तुम्ही जबाबदार असाल तर दुःखासाठीही आपणच जबाबदार असणार ना.. हे आपण साफ विसरुन जातो...

शेवटी मार्ग आखून देणाराही तोच आणि मार्गात काटे टाकणारा आणि आपला सहभाग संपल्यावर मार्गच काढून घेणाराही तोच.....
हे आयुष्य मी आज जगतेय ते त्या सर्वव्यापी सर्वेश्वरामुळेच.. आणि मी या भूतलावर नसेन (तो सोन्याचा लवकर दिन येवो...) तेही त्याच्यामुळेच...

Ayushatil he ganeet asha lokaana sankate alyaavar kalatat ani mag tehi swakartuutwala visarun Eshawarala bhajatat, ase anubhav ahet...atishay practice example deuun tu Eshavanistha vishay mandalaas...chhan lihiles ...baaki kaay suru ahe..tula 1 anandachi batmi dyaychi ahe, nantar deEn.....- Nityanand
उत्तर द्याहटवाwell said :)
उत्तर द्याहटवाकधी कधी वाटतं की त्यानं या आयुष्याची होडी सोडून दिली आहे बेफिकिरीनं वादळी समुद्रात..
उत्तर द्याहटवापण परत मग वाटतं की त्यानं तो समुद्र आपल्या ओंजळीतच तर धरून ठेवला आहे...