पोस्ट्स

जून, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजची पिढी, मनसे आणि सेना

इमेज
      शिवसेनेमुळेच मराठी माणूस मुंबईत टिकून राहीला.. हे वाक्य आपण सर्वांनीच अनेकदा ऐकलंय.. मात्र आता हे वाक्य मागे पडणार असे संकेत मिळू लागलेत.. आमच्या शेजारी ७-८ वर्षांची एक छोटी मुलगी राहते. तिचा गडबड गोंधळ कायम सुरुच असतो, मात्र कालची तिची आरोळी माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण करुन गेली... मनसेचा विजय असो, अशी होती ती आरोळी. सहज मनात विचार आला, माझ्या पिढीला शिवसेना माहिती झाली ती मुंबईतल्या दंगलींमुळे, बाळासाहेबांच्या कुणाची भीडभाड न बाळगता घणाघाती हल्ले करणाऱ्या भाषणांमुळे, शिवसेनेच्या भगव्यामुळे, दिंदुत्वाच्या मुद्दयामुळे...आणि त्या आधीच्यांना ती माहिती होती ती मराठीच्या चळवळीमुळे..पण आजच्या पिढीला शिवसेना माहिती असावी असं काहीच घडत नाहिये.. हे सत्यय... तुलनेत आजच्या पिढीला मनसे माहिती आहे. राज ठाकरे माहिती आहे. याला कारणंही तशीच आहेत. मनसेची मराठी पाट्यांसाठी मुंबईत झालेली आंदोलनं, शाळेतील मराठी भाषा सक्तीसाठी झालेली आंदोलनं( प्रत्यक्ष झालं काही नाही हे आपण जाणतोच) वीज दरवाढीचं आंदोलन आणि त्या पेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राज ठाकरेंची भाषणं ऐकलीयत, त्या...

'त्यांचं' भावविश्व..

इमेज
      आजींनी मला असं काही सांगावं हे पूर्णपण अनपेक्षितच. पण त्यांनी बोलताबोलता त्यांच्या नातेवाईकांच्या फोनची यादीच माझ्या हातात ठेवली,म्हणाल्या,'हे काही जवळचे नातेवाईक आहेत, मला काही झालंच तर यांना फोन कर...' काही क्षण मी काहीच बोलू शकले नाही.. मला खूप वाईट वाटलं, पण वस्तूस्थितीचं भान माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त असल्याचं मला जाणवलं. आजी एकट्याच राहतात. त्यांचे नातेवाईक बरेच आहेत, पण ते आपापल्या कामात व्यग्र! ह्या आजींचं वय साधारण 77-78 असेल. पण त्या कायम म्हणतात "आम्ही म्हातारी माणसं म्हणजे, 'असून अडचण नसून खोळंबा', त्यांच्या वाक्यानं वाईट वाटलं, पण हे खरय.. ही वस्तूस्थितीच आहे. मुलगा आणि सुनेला कुठेतरी बाहेर जायचंय आणि मुलांना बरोबर न्यायचं नाहिये, अशा वेळी मुलांना सांभाळायला घरात आजी-आजोबा हक्कानं घरात असावेत असा आदेश असतो, तर जेंव्हा घरी कुणीतरी पाहुणे येणार असतात अशा वेळी घरात म्हातारी माणसं अडचण वाटूलागतात. हे कटू सत्य आज अनेक घरांत आपल्याला पाहायला मिळतंय. यावर उपाय किंवा त्याला पर्याय म्हणून आपण पाहतो वृद्धाश्रमांकडे. सध्या ज्या धावत्या जगात आपण वावरतोय ...

तुमाला बघून ठरिवलं, पोरीला शिकवनार!

   एक दिवस जांब गावातला..    एक १२-१३ वर्षाचा मुलगा मी दिसले की ओरडायचा 'स्टार माझा.. स्टार माझा' आणि मी त्याच्याकडे पाहून हासत होते, मग तो आपणहुनच जवळ आला आणि म्हणला, "ओ, तुम्ही असताय ना स्टार माझावर.." मी होकारार्थी मान हालवलली, "मी तुम्हाला पाहिलंय स्टार माझावर.., पण मी स्टार माझा पाहात नाही मला पिच्चर खूप आवडतात म्हणून मी स्टार गोल्ड पाहतो..." मी खळखळून हसले...हा संवाद आहे, समर्थांच्या जांब गावतल्या शाळकरी मुलाचा आणि माझा.कीर्तनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळते, तिथलं वातावरण, भाषा, विचार यांचाही थोड्याफार प्रमाणात परिचय होतो.. नुकतंच समर्थांच्या जांब गावला म्हणजेच जांब समर्थ या गावी कीर्तन होतं. तशी मी जांबगावला पहिल्यांदा गेलेली नाही या पूर्वीही मी दोन वेळा जांबगावला गेलीय.. ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवांच्या इच्छेने व कृपेने तिथे जााण्याचा योग आलाय. मात्र गेल्या तीन वर्षात संधी मिळूनही नोकरीच्या रहाटगाडग्यात जाणं शक्य झालं नव्हतं. या वेळी मात्र योग जुळून आला.       जांब हे जालना जिल्ह्यातलं खेडेगांव. १२ते १४ तास लोडशेडींग...