पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजे मोठा प्रमाद घडला.. जमलं तर माफ करा

इमेज
 महाराज.. महाराज.. मालवण मध्ये मोठ्या दिमाखात तुमचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. स्वतः पंतप्रधान आले, नाविक दलाने संचालन केले. कित्ती कित्ती तो देखणा सोहळा केला. तुमच्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे पाहात उभा असलेला तुमचा पुतळा अनेकांचे लक्ष वेधत होता. मलवणातल्या नाविक दलाने म्हणे सगळ्या परवानग्या अशा फटा फट मिळवल्या होत्या. आमच्या राज्य सरकारनेही कोणती कसूर ठेवली न्हवती. कसं अगदी एखाद्या दिवा स्वप्नं प्रमाणे झर झर् घडत गेलं.. ना कुठला अडथळा ना कुणाची आडकाठी.. आता तुमचाच पुतळा म्हंटल्यावर त्याला विरोध तरी कोण करणार? कुणाची असेल बिशाद की असा पुतळा उभारणीला विरोध करेल? पाहता पाहता तुमची मूर्ती बनली काही महिन्यातच.. आणि चबुतरा बांधला.. पंतप्रधान यांची मलवणात यायची तारीख ठरली अन् लगबग आणखीनच वाढली.. बघता बघता पुतळा तयार झाला. फारसा तुमच्या सारखा वाटत नव्हता म्हणे तो, काहीतरी वेगळा वाटतोय असं अनेकांनी बरेचदा सांगितलं म्हणे, पण उपयोग काय? पुतळा विराजमान झाला होता..  एका बाजूने आरबी समुद्रातून येणाऱ्या फेसाळत्या लाटा आणि तेवढ्याच वेगाने वाहणारे खारे वारे, बाजूने माडाची डोलणारी झाडं, समुद्राच...

सांगली कोल्हापूरच्या पूराची कविता

इमेज
  २०१९ सालीची कोल्हापूर सांगलीची स्थिती वर्णन करणारी कविता - सांगली कोल्हापूरला जणू नजर‌च लागली नजर जाईल तिकडं बगा हाय, पाणीच पाणी व्हय की व्हयकी म्हणणारी आता नाय की नाय की करू लागली चांंगली चांगली म्हणता यंदा कृष्णामाई वंगाळ वागली तीरावरच्या लेकरांना लगबगीनं भेटाय आली पण लेकरांसंगं घरादारात कृष्णामाई लईवेळ रमली पावन केलीस भूमी माझी तुझ्या पावन स्पर्शानं पण गुरं-ढोरं-बकऱ्या-मेंढरं वडूनच नेलीस जोरानं बघता बघता घरला माझ्या पडला तुझाच घेरा सगळं सोडून बेघर झाला प्रत्येक घरचा राजा पाया पडतू हात जोडतू का बाई कावलीस आमच्यावर तुझ्यामुळच तर निवांत जगलो, पण घेतलस आता फैलावर लई कमवलं तुझ्या साक्षीनं, आता झालो कफल्लक परत शून्यात नेऊन ठेवलस वाढली जीवाची धकधक कृष्णा माई तुझ्या भेटीनं झाला जीव हा कृतार्थ पुन्हा नव्याने उभे राहाण्या कर आम्हा तू समर्थ, कर आम्हा तू समर्थ! 😢🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽😢 प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक©