पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टिप्पिकल मराठी असल्याचा सार्थ अभिमान !

इमेज
Dear Sir, जुन्या, अल्हाददायी, अलवार मनाला हात घालणारे अनेक प्रसंग, अनेक आठवणी आपल्याला आठवतात.. आईचा पदर, दारातलं तुळशी वृंदावन, आजीनं आडाशेजारी घातलेली अंघोळ आणि बरंच काही...  खरंतर या गोष्टी तुम्हालाही आठवतातच ना.... विचारांध्ये कितीही Larger picture आणलं तरीही जुन्या आठवणींमध्ये काही माणसं रमतातच ना... मला यात कोणतीही typical middle-class Maharashtrian mentality वगैरे वाटत नाही... बंगाली माणूसही त्याच्या भाषेत हे लिहितो, तसंच अमेरिकनही त्याच्या जुन्या आठवणींची उजळणी करतो... एखाद्याला त्यात त्याचं जगणं हरवलं आहे असं वाटलं तर बिघडलं कुठं...??? हे सगळं लिहिण्याचं कारण 2010 साली माझ्या एका मराठीच बॉसने मला 'आईचा पदर, दारातलं तुळशी वृंदावन, आजीनं आडाशेजारी घातलेली अंघोळ' यावर फार वाईट comment दिली आणि ही टिप्पीकल मराठी मेंटॅलिटी असल्याचं म्हंटलं, इतकंच नाही तर त्यांनी त्यावेळी मृणाल कुलकर्णी कशी अजूनही ऑडी गाडीच घेऊन फिरते असं म्हणत तिचाही उद्धार केला होता.... त्यावर मात्र मी भडकले आणि त्यांचीच बिनपाण्यानं काढली. सिचन तेंडुलकर, माधुरी दीक्षितचं उदाहरण दिलं आणि मग मेलद्वारेस...

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त.. #worldpopulationday

इमेज
  मी साधारण तिसरीत असताना म्हंटलं होतं की, जर मी #पंतप्रधान झाले तर मी असा आदेश देईन की कुणी लग्नच करायचं नाही. यावर अचंबित होऊन आई-बाबांनी सहाजिक प्रश्न केला, कागं? त्यावर माझं त्यावेळचं बालीश उत्तर होतं की, लग्नच केलं नाही तर लोकसंख्या वाढणार नाही आणि मग लोक संख्या वाढली नाही तर लोकांना व्यवस्थित जेवण मिळेल! कारण 'लोकसंख्या वाढीमुळेच' अनेक लोकांना उपाशी राहावं लागतं असं माझ्याच वयाच्या भावानं मला सांगितलं होतं.. आता या माझ्या तर्कावर घरी सगळेच हसले होते. आणि अशाने लोकसंख्या नियंत्रणात येत नाही इतकेच सांगितले होते.(व मी आयुष्यात कधीच राजकारणात जाऊ शकत नाही याची घरच्यांना खात्री पटली होती..) विनोदाचा भाग सोडा, पण आज हे आठवण्याचं कारण म्हणजे 'जागतिक लोक संख्या दिन'! १८०४ साली जगाची लोकसंख्या १ अरब होती जी आज २०२२रोजी ७.९ अरब झालीय. जागतिक लोक संख्या दिनानिमित्त सध्या जगाची लोकसंख्या भरभक्कम प्रमाणात वाढत आहे. आता ही स्थिती खरच चिंताजनक आहे का तर, ज्या देशांमधे लोकसंख्या नियंत्रणात आहे तिथे तसा प्रश्न नाही. पण काही देशांसाठी हो, कारण जिथे बेसुमार लोकसंख्या वाढत आहे त्या प...

सरकार आता तरी जागं होणार आहेय का?

इमेज
(२००९ साली स्टार माझात असताना लिहिलेला हा मजकूर आहे, मी तो ब्लॉगवर टाकलाच नव्हता, पण आजही तो तंतोतंत लागू पडतोय..) 3/8/2011 सालातला हा ब्लॉग आहे, यामध्ये ताजवरील दहशतवादी हल्ल्यानंतरचा संदर्भ आणि राजकीय स्थितीवर भाष्य केलं होतं.. सरकार आता तरी जागं होणार आहे का?   नाही-हो नाही-हो म्हणत एकदाचा राम प्रधान समितीच्या ६०० पानी अहवालाचा १०० पानी सारांश विधीमंडळात सादर झाला. मात्र यापूर्वीच माध्यमांनी म्हंटल्याप्रमाणे पोलीस आणि प्रशासनातल्या समन्वयाचा आभावच या अहवालाच्या रुपानं पुन्हा समोर आलाय. मुळात 'मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो', हा इशारेवजा संदेश मुंबई पोलिसांना मिळाला होता, मात्र त्याचा योग्य तो अर्थ लावण्यात पोलिस आणि प्रशासन अपयशी ठरलं. आणि हे आता उघडच आहे.          मात्र या अहवालाच्या माध्यमातून पुन्हा एक गोष्ट प्रामुख्यानं समोर येतेय आणि ती म्हणजे आपल्या पोलीस दलात एके ४७शी आणि दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी पुरेसा पोलीस ताफा तर नाहीचे पण शस्त्रास्त्रंही अत्यंत अपुरी आहेत. आपल्या पोलीस दलात अत्याधुनिक शस्त्...

फडणवीसांना उपमुख्यमंत्री का केलं असावं? शाहांनी खरच पंख छाटले का?

इमेज
 #राजकारणात जे सर्वोच्च पदावर विराजमान होतात, त्यामागे त्यांची मेहनत आणि नशिबाचा भागही खूप महत्त्वाचा असतो. मात्र एकदा त्या पदावर ती व्यक्ती गेली की आपल्या आसपास येतेय, किंवा आपल्यापेक्षा सरस ठरतेय, किंवा आपल्यापेक्षा उंची वाढतेय, किंवा आपल्याच पदाला धक्का लावू शकेल असं सर्वोच्च नेत्याला जाणवलं की त्या वयक्तीचे पंख छाटलेच म्हणून समजा.. हे सगळं वर्णन महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तंतोतंत लागू होतंय..याचं कारण असं की गोव्यापासून विजयाचे शिल्पकार अशी बिरुदीवली मिरवणारॆ देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्ष नेते होऊनही भाजपच्या पथ्थ्यावरच पडलेत. राज्यसभेतला आकड्यांचा खेळ, धनंजय महाडिकांचा अपनेक्षित विजय, सेनेला अद्दल घडवण्याचा प्रयत्न मग विधान परीषदेतही आमदार फोडून दाखवलेला करीश्मा आणि नंतर थेट सेनेच्या आमदारांचं बंड किंवा सेनेच्या भाषेत पळवापळवी. या सगळ्यात यशस्वी होऊनही मी पदाचा लोभी नाही हे दाखवून पत्रकार परिषद घेत दाखवलेली दिलदार वृत्ती. आता इथवर सगळंच जादुई आणि अशक्य ते शक्य करणारे  अवलिया फडणवीस झाले होते. पण नेमके दुपारी ३ ते ७ या काळात धडाध्धड घडामोडी घडल्या अन् पक्षशिस्त ध्याना...