मराठीची ऐशीतैशी आणि पालक
जे लोक आपल्या पाल्यांना मराठी शाळेत आवर्जून घालतात अशांचे खूप खूप अभिनंदन.. येत्या काळात मातृभाषेची ऐशीतैशी करणाऱ्यांमध्ये ते नक्कीच नसतील.. परवा माझा मित्र आणि आमच्या शाब्बास या कार्यक्रमातील निवेदकाचे बाबा बोलत उभे होतो.. बोलता बोलता आमचा निवेदक मराठी शाळेत शिकतो हे माझ्या मित्राला कळलं, त्यानं लगेचच त्याच्या बाबांचं अभिनंदन केलं. आणि मराठी शाळांमध्ये मुलांना कसं घातलं जात नाही, आणि त्याचा कसा मुलांनाच तोटा होतो हा विषय निघाला. खरे पाहता आमची बहुतेक सर्व पिढी मराठीतच शिकली, काही जणांना आठवीनंतर सेमी इंग्लिशचा पर्याय होता, ते तिकडे वळले, पण मराठीतच पूर्ण दहावीपर्यंत शिक्षण घेऊन डॉक्टर - इंजिनिअर बनलेल माझे मित्र आहेत. जे आज चांगल्या पदावर चांगलं काम करत आहेत. मुळात बहुतेक पालक स्वतः देखील मराठी माध्यमात शिकलेत पण त्यांच नोकरीच्या ठिकाणी कधीच आडलं नाही कारण मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी हे कॉनव्हेन्ट स्कूलच्या मुलांपेक्षा कित्येकपटीनं चांगलं असतं, हे सिद्ध झालेलं आहे. असं असतानाही जे लोक आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालण्याचा जो केविलवाणा अट्टहास क...