भारताची आन बान शान अखंड राहणार
.png)
पण माझे डोळे का पाणावले? कारण मी त्यांचं मिठ खल्लंय आज प्रत्येकाच्या जेवणातही टाटा आहेतच. कारण मिठा पासून, चहा, स्टील, मोठाले रस्ते आणि त्यावरून धा वणारी वाहन असं सगळं काही भारतात टाटामय आहे. अन्न वस्त्र निवारा आणि प्रवास अशा माणसाच्या सर्व गरजा ओळखून त्या सर्व क्षेत्रात आपली छाप सोडणारी संस्था म्हणजे टाटा! आणि याच समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा. पण हे जाज्वल्य व्यक्तिमत्व हरपलंय. गरज असेल तिथे कठोर पण मनाने हळवे, सोज्वळ, सात्विक आणि कर्तव्यनिष्ठ असं हे व्यक्तिमत्व.. देशावर आलेलं संकट म्हणजे जणू आपल्या घरावर आलेलं संकट असं मानून त्यांनी आजवर प्रत्येक गरजेच्यावेळी मदतीचा हात दिलाय. संपत्तीला टाटा ट्रस्टमध्ये विलीन करणारे असे क्रांतीसूर्य होणे नाही.#टाटा #tata #रतनटाटा #tataindustries टाटाच्या जवळपास १०० कंपन्या आहेत आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात टाटा समूहाच्या कंपन्या पसरल्यात. भारता पाठोपाठ अमेरिका आणि इंग्लंड मध्ये टाटाची उत्पादनं सर्वात जास्त वापरली जातात. एकूण १५० देशांमध्ये त्यांची उत्पादने गेल्या अनेक वर्षांपासून वापरली जातात. रतन टाटा यांचं वैशिष्ट्य म्हणजे कल्पक...