राजकारणाच्या केंद्रस्थानी उद्धव ठाकरे
.png)
उध्दव ठाकरेंचं पारडं जड! ठाकरे - फडणविसांची एकत्र 'लिफ्टवारी' खूपच बोलकी आणि राजकारणातल्या केंद्रस्थानी आलेल्या उध्दव ठाकरेंचं राजकीय महत्त्व अधोरेखित करणारी आहे. भलेही अजब तुझे सरकार म्हणत अनेकांनी चेष्टा केली असली तरी आजच्या घडीला सर्वांनाच उद्धव ठाकरेच हवे आहेत.. याचं मुख्य कारण पक्ष फुटूनही शिवसेनेचे उबाठा गटाचे ९ तर शिंदे गटाचे ७ खासदार निवडून आलेत. म्हणजे खरंतर राज्यातला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस (१३ आणि १ अपक्ष असे १४ खासदारांसह) मोठा ठरला असला तरी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मिळून १६ खासदार निवडून आलेत.. उद्या जरी हे दोन्ही गट दिलजमाई करत मनोमिलन करत एकत्र आले तर यांच्या जागांमध्ये घसघशीत वाढ होऊ शकते. याचं कारण शिंदेचे खासदार जरी कमी असले तरी त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आलाय. याचाच अर्थ हे एकत्र लढले असते तर कदाचित १६च काय २० पेक्षा जास्त जागा शिवसेनेला मिळू शकल्या असत्या.. आता तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरेंकडे सहानुभूती होती म्हणून त्यांना जागा मिळाल्या.. पण तुम्ही देशातल्या लोकसभेच्या निवडणूक निकालाचे आकडे पाहिले तर अनेक गोष्टी अधोरिखित होतात. आणि शिवसे...