वारी म्हणजे काय? शासकीय पूजा म्हणजे काय?

वारी म्हणजे काय ? #wari #वारीम्हणजेकाय ‘ अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर ’ असं पंढरपुराचं वर्णन करता येईल.. तर काही वारकऱ्यांना संत तुकोबांच्या अभंगातील ।आनंदाचे डोही, आनंद तरंग। आनंदची अंग आनंदाचे।। या ओळींचा अनुभव येत असेल.. तर संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे ।जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले, म्हणूनी विठ्ठले कृपा केली।। असा भाव अनेक वारकऱ्यांच्या मनात आहे.. तर संतश्रेष्ठ तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे अनेक वारकऱ्यांचा अनुभव हा असा असतो आमुची मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥ पांडुरंग आमुचा पिता । रखुमाबाई अमुची माता ॥२॥ भाऊ पुंडलीक मुनि । चंद्रभागा अमुची बहिणी ॥३॥ तुका जुनाट मिरासी । ठाव दिला पायापाशीं ॥४॥ आनंदाचे क्षण म्हणजे वारी, माहेरची आठवण म्हणजे वारी, संताचा सहवास म्हणजे वारी, अन् मायेची ऊब म्हणजे वारी... वारीचं असं कितीही वर्णन केलं तरी अपुरंच... वारीची परंपरा मजल दरमजल करत जी पायवाट फक्त आणि फक्त विठ्ठल आणि संतांच्या नामाने चालली जाते ती पायवाट म्हणजेच वारी.. वारीची परंपरा तशी हजारो वर्ष जुनी आहे.. तेराव्या शतकात देखिल ह...