स्वतःला आजमवणे सुरु.. अनुभवाची शिदोरी भरतेय...
अनुभवाची शिदोरी भरतेय... खूप दिवसंपासून काहीतरी लिहायचं असं ठरवतेय.. थोडंसं लिखाणही झालंय पण ते पोस्ट करावं या लायकीचंच मला वाटत नव्हतं. धीर करुन आज पुन्हा लिहायला बसलेय. (ही पोस्ट देखील २०११साली अर्धवट लिहिलेली होती. पण आजही त्यात फारसा बदल झालेला नसल्यानं १४ वर्षांचा उल्लेख करत टाकतेय) आयुष्यात केवळ चांगलेच लोक भेटावेत असं कधी वाटलंच नाही. कारण माझ्या आसपास मित्र-मैत्रिणींचा चांगल्या नातेवाईकांचाच गराडा होता... पण नोकरी लागली आणि चारच वर्षात मी 'शहाणी' झाले. नोकरीच्या ठिकाणी भेटलेले नाना तऱ्हेचे लोक त्यांचं वागणं एक दाखवणं एक, थोडक्यात 'दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे'. या सगळ्या गोष्टी सुरुवातील मला तशा नवीन होत्या. वाटायचं.. अरेच्च्या अत्ता तर या माणसाने त्याच्याबद्दल इतकं चागलं सांगितलं आणि जशी त्याची पाठ फिरली हा लागला बरळायला.. आश्चर्य वाटायचं, विचित्र वाटायचं.. कुठे येऊन पडले मी असं वाटून कधी कधी पश्चात्तापही व्हायचा.. पण नंतर एक गोष्ट ध्यानात आली की यालाच अध्यात्मात अलिप्तता म्हणतात, आणि तीच शिकायला बहुदा ईश्वरानं हा मार्ग मला दिलाय..आणि एक गोष्ट पक्क...