दोन हात जोडण्याची वेळ ठरवली तर बिघडलं कुठे?

आयुष्यात असे अनेक लोक भेटतात, ज्यांच्याकडून आपण काही शिकावं.. पण कधी कधी वाईट वाटतं कारण काही असेही भेटतात ज्यांना आपणच काही शिकवावं... आता मी शिकवावं असं आहेच काय असं वाटेल.. पण जीवनाची सामान्य गणितं चूकवण्याचा जिथे प्रयत्न होतो तिथे काहीतरी सांगावंच वटतं.. देव न मानणारे जगात खूप लोक आहेत.. देव मानल्यानं किंवा न मानल्यानं खरंतर कोणाचंच काही बिघडत नाही.. असंच जर आहे तर आपल्या मुलांना किमान वळण लागावं यासाठी काही नियम केले तर बिघडलं कुठे..... जेवणाची वेळ पाळायची.. शाळेची वेळ पाळायची.. कॉलेजची वेळ पाळायची.. क्लासेसच्या वेळा पाळायच्या.. ऑफिसची वेळ तर पाळलीच पाहिजे... (अर्थात फक्त नोकरांनी) या वेळा का पाळायच्या?, तर सर्वांसाठी एक नियम तसंच आपल्यलाच शिस्त लागावी, कामं योग्य त्या वेळेत व्हावीत यासाठी ...मग दोन हात जोडण्यासाठी एक वेळ दिली तर बिघडलं कुठे?? स्वयंशिस्तीचे धडे प्रत्येकानंच लहानपणी गिरवलेत.. मग त्यातलं जेवायला मांडी घालून बस, इथपासून ते अगदी वाचताना ताठ बसून वाच, उठल्या उठल्या शौचाला जा... असे काही उपदेशाचे डोस ऐकून आपण लहानपणी खूप वैतागलोय.. पण आता या सव...