पोस्ट्स

जुलै, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाड्याच्या घरातला आत्मा..

इमेज
जन्माला येताना कोणतीच व्याधी न घेता जन्माला आलेलं हे शरीर किती खराब करुन टाकलं मी.. आणि तेही काहीच वर्षात..  याची आता अचानक जाणीव झाली, खरं तर हे शरीर मी माझं समजते पण कदाचित काहीच वर्षात ते जळून खाक होईल.. कारण त्यातली प्राणज्योत मालवलेली असेल, हातपाय न हलवणाऱ्या मृत शरीरला कोण पोसणार? असं असूनही मी माझ्या शरीराला का जपते.. बरं आयुष्यही किती आहे याचा अंदाज नसताना आपण आपल्या शरीराची केवढी काळजी घेतो.. अगदी आपल्या स्वतःच्या घराप्रमाणे.. खरं तर आपलं स्वतःचं घर आपण कधीच बरोबर घेऊन जात नाही पण तरीही त्याची स्वच्छता राखतो, देखभाल करतो... मग हे शरीर आणि घर आपण जर बरोबर नेणारच नाही तर ते जपावं तरी का?  प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच शोधायची सवय लागलेली असल्यानं याचंही उत्तर मिळालं.. देहालाच आपलं कायमस्वरुपी घर समजून बसल्यानं खरंतर ही गल्लत होते.. हा देह म्हणजेच मी, हीच मोठी चूक आपण करतो. देहाचा भार सांभळणारा आपला आत्मा म्हणजे खरा 'मी' ज्याला मीची मुळीच जाणीव नाही. तोच आत्मा शरीराचा खरा भरण पोषण कर्ता..परमेश्वरानं मला निरोगी शरीर भाड्यानं दिलंय.. त्या शरीराचा वापर करुन मला आत्मोन्नती कर...