लग्नाचा बाजार आणि perfect material..

मला तर मुळी लग्नच करायचं नाही.. मला अश्शीच बायको हवी.., मला बुटका आणि काळा मुलगा नको.., लठ्ठ पगाराचाच नवरा हवा... लग्नाआधीच्या मागण्या एक ना अनेक.. पण या साऱ्या मागण्या अनेकदा आपल्या कानावर पडलेल्यात.. सध्या यातली इन फॅशन मागणी म्हणजे- 'ती किंवा तो लग्नासाठी योग्य मटेरिअल हवा..', 'फ्रेंड आणि टाईमपास म्हणून ठिके, पण आयुष्य काढायचं तर तो वा ती परफेक्ट मटेरिअल असायला हवी..' यावर आढळेललं साधर्म्य प्रत्येक गावामध्ये बाजाराचा एक दिवस-वार ठरलेला असतो.. त्यावारी आसपासच्या तसंच आजूबाजूच्या गावातूनही बरेच लोक आपला माल घेऊन येतात, कारण अपेक्षा असते की आपल्या मालाला चांगला भाव मिळेल, चांगला खपही होऊ शकेल. यामध्ये भाजीपाल्यापासून ते अगदी प्लॅस्टिकच्या वस्तूंपर्यंत सारेचजण तिथे आलेले असतात. आपण भाजीवाल्यांचं उदाहरण पाहू. ज्यात एखादा मिरचीवाला असतो तर एखादा बटाटेवाला.. असे अनेक मिरची-बटाटेवाले तिथे येणार असतात, पण या सगळ्यात आपला माल जास्त खपावा आणि त्याला चांगली किंमत मिळावी यासाठी प्रत्येकजण आपला माल चकाचक करुन आणतो.. मग तिथे येणारा ग्राहक तो मा...