पोस्ट्स

एप्रिल, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आमच्या आजी.. उरल्या सगळ्या त्या आठवणी..

इमेज
      आजही त्यांची आठवण आली तरी डोळ्यातलं पणी लपवणं अवघड जातं.. अशा लोकांमध्ये फक्त तिनच जण आहेत, ते म्हणजे माझे सगळ्यात मोठे काका, माझी ९७वर्षाची आजी आणि या आजी.. या आजी ना नात्याच्या ना गोत्याच्या पण लळा मात्र अगदी नात्याच्या माणसाप्रमाणे अपोआप लागला..       आमच्या आजी आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती झालेल्या.. अर्थात त्या आमच्या सख्ख्या आजी न्हवत्या पण तरी आजी कोणतीही असो, आजी ती आजीच..       या आजी म्हणजे मी ज्यांच्याकडे सव्वातीन वर्षं पेइंगेस्ट म्हणून अगदी बिनधास्त, आपलं हक्काचं घर असल्याप्रमाणे राहत होते त्या. घरुन फोन असो की मित्रांचा-मैत्रिणींचा-परिचितांचा वा नातेवाईकांचा, सगळेचजण आवर्जून त्यांची चौकशी करणार. म्हणजे इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यानंतर, ..तुझ्या आजी काय म्हणतायत? अशी सगळेजण हटकून चौकशी करणार. मग मी पण त्यांची छान ख्याली-खुशाली द्यायचे. त्या सुद्धा कधी पुण्याला जाऊन आले की घरच्यांची चौकशी करायच्या, कीर्तनासाठी मी जिथेजिथे जायचे, तिथल्या वातावरणाची, लोक कसे असतात अशी चौकशी करायच्या. त्यांना मी कीर्...