पोस्ट्स

फेब्रुवारी, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

त्या दिवसाची ती किस्स्....

व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी मन्या खूपच खूष होता.. इतका की त्याचं हसणं आता जरा अती आणि नकोनकोसं वाटत होतं.. हे सगळं माझी मैत्रीण जबरदस्ती सांगत होती.. पण थोडं गॉसिप स्टाईल असल्यानं सगळेचजण ते ऐकत होते.. त्या दिवशी म्हणे त्यानं त्याची स्वप्नातली गर्ल फ्रेन्ड रुपाला गुलाब दिला आणि मन्याच्या कानाखाली वाजवण्याऐवजी म्हणे तिने तो स्वीकारला पण शिवाय म्हणे त्याला डेटिंगला सुद्धा बोलावलं.. how romantic !!, एका मुलीनं टिप्पिकल प्रतिक्रिया दिली... we 2-3 people were not much interested but listning, कारण दुसरं काहीच काम नव्हतं..(तसंही कॉलेजच्या दिवसात बहुतेक उडाणटप्पूच असतात..) पण मला नेमका 'आज नेटबॉलची प्रॅक्टिस होणार नाही' असा फोन आल्यानं मलाही बराच वेळ होता.. आम्ही ऐकत होतो आणि मन्याची कथा पुढेपुढे सरकत होती आणि फारच इंटरेस्टिंग होत होती.. मन्या आणि त्याला कधीच भाव न देणाऱ्या रुपानं त्याला भाव दिला आणि संध्याकाळची वेळही ठरली म्हणे त्यांची भेटण्याची.. मन्यानं सकाळी सकाळीच कॉलजला आल्या आल्या रुपाला गुलाब दिला होता.. आणि हाईट म्हणजे रुपाचा खराखुरा बॉयफ्रेंड त्या दिवशी तिला भेटायला सुद्धा ...