पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कविता - मतांचा सडा

इमेज
  पूर्वीच्या राजकारणात होती अदब, होता दरारा आता मात्र नुसताच चोथा, अन् विचारांचा तर बोजवारा   आधीच्या राजकारणात होती एक बैठक अन् विचारधारा आता सगळेच उत्श्रुंखल अन् विचारांचा तर बोजवारा   चावट, डांबरट, मग्रूर की दीडशहाणी कोणतीही बिरुदं 'मिरवतील', तेच खरे राजकारणी   अचार-विचारांबाबत बहुंताश टुकार मर्कट, सरडा, गेंड्यालाही करतील बेजार   भुरटे, पाकिटमार तर काही दरोडेखोर लोकांचेच लुटारू अन् वर शिरजोर   उणीदुणी काढून वेळ मारून नेणार तुम्ही आम्ही यडे, यांनाच मतदान करणार   दिखाव्याला भांडण अन् एकमेकांवर ताशेरे खायची संधी मिळताच, ‘ ऐ, हे सगळे आपलेच रे ’   शहाण्यानं राजकारणात पडू नये म्हणतात म्हणूनच माणसाऐवजी धंदेवाईक जिंकतात   स्वातंत्र्य मिळून झाली, जरी एवढी वर्ष असल्या राजकारण्यांच्या तावडीत राहून आपण मानतोय हर्ष   शहाणे व्हा, सजग व्हा, यांच्या नादी लागू नका (कार्यकर्तेहो..) यांची पोरं शिकतात परदेशात आणि तुम्ही मसणवट्यात किंवा पडक्या वाड्यात   आता खरी वेळ आली, शिकवा यांना धडा स्व...