पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामी तुम्हीच तारणहार (#कविता)

इमेज
 तुम्हीच तारणहार आमुचे  स्वामी, तुम्हीच तारणहार जगन्नियंता असुनी रक्षी आम्हा दीनपतिता पिल्लावरी जसे लक्ष घारीचे, तैसी तू माता उत्तमातही अति उत्तम जे, देण्या तू तत्पर कर्मदरिद्री आम्हीच कैसे, पात्र करा सत्वर दिलेस मजला भरभरून तू, मागता न मागता ते पेलवणे, ते वाढवणे, तुम्हीच वाहावी चिंता कर्म करण्या तत्पर असूनी विघ्ने कैसी येती हीच परीक्षा दावूनी आम्हा तूच पुन्हा तारिसी चुकलो-भुललो-क्षणभर रडलो, तुझीच ही लीला पण आभार कैसे मानू जेंव्हा देसी हास्य सुख माला हास्य फुलविसी वदनावरती तूच सर्वकर्ता तुझ्या कृपेने येती दारी अखंड शुभ वार्ता नाम तुझे मुखी अखंड राहो हीच चरणी प्रार्थना चित्त वृत्ती मन शरीर येवो अखंड तव दर्शना ©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक