फडणवीसांना उपमुख्यमंत्री का केलं असावं? शाहांनी खरच पंख छाटले का?
#राजकारणात जे सर्वोच्च पदावर विराजमान होतात, त्यामागे त्यांची मेहनत आणि नशिबाचा भागही खूप महत्त्वाचा असतो. मात्र एकदा त्या पदावर ती व्यक्ती गेली की आपल्या आसपास येतेय, किंवा आपल्यापेक्षा सरस ठरतेय, किंवा आपल्यापेक्षा उंची वाढतेय, किंवा आपल्याच पदाला धक्का लावू शकेल असं सर्वोच्च नेत्याला जाणवलं की त्या वयक्तीचे पंख छाटलेच म्हणून समजा.. हे सगळं वर्णन महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तंतोतंत लागू होतंय..याचं कारण असं की गोव्यापासून विजयाचे शिल्पकार अशी बिरुदीवली मिरवणारॆ देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्ष नेते होऊनही भाजपच्या पथ्थ्यावरच पडलेत. राज्यसभेतला आकड्यांचा खेळ, धनंजय महाडिकांचा अपनेक्षित विजय, सेनेला अद्दल घडवण्याचा प्रयत्न मग विधान परीषदेतही आमदार फोडून दाखवलेला करीश्मा आणि नंतर थेट सेनेच्या आमदारांचं बंड किंवा सेनेच्या भाषेत पळवापळवी. या सगळ्यात यशस्वी होऊनही मी पदाचा लोभी नाही हे दाखवून पत्रकार परिषद घेत दाखवलेली दिलदार वृत्ती. आता इथवर सगळंच जादुई आणि अशक्य ते शक्य करणारे अवलिया फडणवीस झाले होते. पण नेमके दुपारी ३ ते ७ या काळात धडाध्धड घडामोडी घडल्या अन् पक्षशिस्त ध्याना...