हिंदकेसरी मारूती मानेंची तशी वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. पण मारुती माने हे आपल्याच गावचे म्हणजे कवठेपिरानचे असल्यानं मला आणि माझ्या भावाला त्यांचा कोण अभिमान..! भले आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही तरीही त्यांच्याबद्दल अभिमान अजुनही कायम आहेच.. ऑफिसमध्ये पाऊल टाकलं आणि मारुती माने गेल्याची बतमी पाहिली. लागलीच मी बाबांना फोन केला... बाबा अंत्यदर्शनाला आणि अंत्यविधाला गेले.. खरंतर मी नुसतीच नावचीच कवठेपिरान या गावची, पण बाबांचा, माझ्या चार काकांचा आणि दोनही आत्यांचा जन्म कवठेपिरानचाच. त्यांची शिक्षणंही तिथेच झाली.. पण बाबांकडून, काकांकडून मारुती मानेंचं नाव बरंच ऐकलं होतं... कवठेपिरान ह्या़ गावाची ओळख म्हणजे गुंडांचं गाव... पण मारुती मानेंनी ती ओळख बदलली.. हिंदकेसरी मारुती मानेंचं गाव आणि अलिकडेच कवठेपिरान हे ग्रामस्वच्छाता अभियानाअंतर्गत पहिल्या क्रमांकाचं आलेलं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली ती त्यांच्यामुळेच. या मारुती मानेंनी हालाखीच्या परिस्थितीतून अक्षरशः शून्यातूनच सगळं ऐश्वर्य उभं केलं... हे सगळं मला माहिती अस...