पोस्ट्स

जुलै, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोप्पा उपाय आणि योग्य वेळ

      सर्वांना आपल्यासारखाच तो, किंवा ती असं मानणं किती चूकीचं आहे, हे त्याच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.       झालं असं की ऑफिसमध्ये त्याचं आणि त्याच्या मित्राचं(अर्थात ज्या व्यक्तिला तो आपला चांगला मित्र मानत होता असा..) कडाक्याचं भांडण झालं. चूक नसतानाही त्याला वरिष्ठांच्या जोरामुळे आणि मित्राच्या खोटेपणामुळे बरंच ऐकून घ्यावं लागलं. त्यात त्याची नोकरी जाता-जाता वाचली.. आणि त्याला आयुष्यात इतका जबरदस्त वाईट, पण चांगला धडाच मिळाला जणू.. ज्याच्यावर आपला चांगला सहकारीच नव्हे तर चागला मित्र म्हणून त्यानं विश्वास ठेवला त्यानं त्याचा केसानं गळा कापला. हे सगळं सांगताना अमनला हुंदका आवरेना. आणि अमनला समजावणं मला फारच कठीण झालं.. कारण त्याला एकवेळ नोकरी गेली असती तरी चाललं असतं, पण हे असं, कारण नसताना भलतं-सलतं ऐकून घेणं नको होतं.. पण तेच घडलं होतं. आणि त्याच्या 'सोकॉल्ड' मित्रानं त्याचं नाव जितकं खराब करता येईल तितका प्रयत्न केला होता. हे सगळंच त्याच्यासाठी अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. यातून बाहेर पडण्याचा त्याचा प्रयत्न स...

माझी आजी

इमेज
माझी आजी....       नुसतं आजी जरी म्हंटलं, तरी डोळ्यातलं पाणी मी थांबवू शकत नाही.. तिचा जन्म १९१४ सालचा, ९६ वर्षाची होती ती.. ती कधीतरी आम्हाला सगळ्यांना सोडून जाणारच याची कल्पना असूनही मला तिच्या जाण्यानं जो धक्का बसला, त्यातून बरेच महिने सावरण्याचा प्रयत्न करत होते.. आजही मी त्या प्रयत्नात यशस्वी झालेय असं मला वाटत नाही. अर्थात मला तिचा सहवास अत्यल्पच लाभला असं म्हणायला हवं.. कारण साधारण ५ वर्ष मला तिचा सहवास लाभला.. आणि ते शक्य झालं माझ्या मावशीमुळे.. (मावशीबद्दल स्वतंत्र लिहावंच लागेल, तर ती कळेल) खरंतर माझी आजी पुण्यात्माच, तिच्यामुळेच मी थोडीफार शांत होऊ शकलेय.       आजीमध्ये इतकेसाऱे गुण होते की तिच्याकडून घ्यावं तितकं थोडंच. अतिशय कुशाग्र, चाणाक्ष, तीव्र स्मरणशक्ती, हसतमुख राहणे, कोणत्याही परिस्थितीत अतिशय शांत राहणारी, सर्वांवर प्रेम करणारी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी माझी आजी.. पाण्याची उपमा तिला चपखल लागू पडू शकते, पाणी जसं कोणत्याही आकारात कोणत्याही रंगात रंगून जातं पण त्याचं अस्तित्व जसं कायम असतं, त्याच प्रमाणे होती माझी आजी. ती मुळ...